पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीची घोषणा निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. या जागांसाठी भाजपकडून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्यातून स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. यातच आता उद्या म्हणजे सहा फेब्रुवारी कसब्यातील उमेदवार हेमंत रासने उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
“ठाकरेंच्या रिफायनरी विरोधामुळे कोकणाने 1 लाखांचा रोजगार गमावला,” फडणविसांचा गंभीर आरोप
यातच काल भाजपकडून हेमंत रासने यांना कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय आठवले गट, शिवसंग्राम, रासप, पतीत पावन संघटना युतीचे उमेदवार म्हणून हेमंत रासने उद्या अर्ज दाखल करणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून राजकीय पक्षांना विनवणी केली जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला होता. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्वपक्षीय नेत्यांना कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध होण्याची मागणी केली आहे. यावर आता दिपक केसरकर यांनी देखील भाष्य केलं आहे.
“त्यांनी आता साधा नागपुरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा”, एकनाथ खडसेंनी डिवचलं
निवडणुक बिनविरोध व्हायला हवी. ती महाराष्ट्राची पंरपरा आहे. पुर्वी ती खंडीत झाली होती. तेव्हा शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेऊन परंपरा पुन्हा सुरू केली होती. शरद पवार हे सर्वांचेच नेते आहेत. त्यामुळे यावेळी ते ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतील, अशी मला खात्री आहे.
Read also
- “शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”
- “नव्या सरकारने 40 आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं,” अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
- “मुख्यमंत्र्यांचा पटोलेंना फोन, तरीही कसब्यातून लढणार ;” नाना पटोलेंनी शड्डू ठोकला
- “नाराजी, खंत, तरीही आदेश मान्य, हेमंत रासनेंनी घेतली शैलश टिळकांची भेट”
- “नाना भाऊ काॅंग्रेसमध्ये राहुन भाजपचं उघडपणे काम करताहेत,” राष्ट्रवादीचा नाना पटोलेंवर आरोप