पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच भाजपकडून कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी घोषीत केली आहे. तर दुसरीकडे काॅंग्रेसने देखील याची जोरदार तयारी सुरू केली आहे. यात ही निवडणुक बिनविरोध व्हावी, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला. परंतु कुटुबीयांच्या व्यक्तिरिक्त उमेदवार दिल्याने ही निवडणुक बिनविरोध व्हावी, असं काही राहिलं नसल्याचं पटोले यांनी सांगितलं.
“नाना पटोले ते भाजप, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे.;” सत्यजीत तांबें कुणाबद्दल काय काय म्हणाले
मला मुख्यमंत्र्यांचा पोटनिवडणुकांसदर्भात काल फोन आला होता. त्यांनी परंपरा सांगितली होती. कुटुंबातील कोणी जातो तर आपण ती जागा बिनविरोध निवडून देतो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.. पण कसब्यातील तो वाद संपला. भाजपने कसब्यातून कुटुंबात उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आम्ही कसब्याची तयारी करत आहोत. कसब्यातून काॅंग्रेसचा उमेदवार असणार आहे. पक्ष अध्यक्ष म्हणून मी या निवडणुकीत लक्ष देत आहे, ती निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. आज रात्रीपर्यंत उमेदवार फायनल होईल. उद्या अर्ज भरू. असं नाना पटोले यांनी टिव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
“संताप वाटतो, आव्हाड तुम्हाला ऐकतांना..” त्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आव्हाडांवर भडकल्या
चिंचवडचं मला माहित नाही. चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत. असंही पटोले यांनी म्हटलं आहे. कसब्याबाबत प्रस्ताव देण्याची विनंती मी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. पण भाजपने टिळक कुटुंबातून उमेदवारी न दिल्याने आता तो प्रश्नच राहिला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यातच आता कसब्यातून शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला नाही. तर आमचा उमेदवार असणार आहे. परंतु त्यांनी जर उमेदवार उभा केला तर त्याला आमचा पाठिंबा आहे. यातच आता वंचितकडून कसबा पोटनिवडणुकीत प्रफुल्ल गुजर यांचं नाव चर्चेत आलं आहे. त्यांनी निवडणुकीचा अर्ज खरेदीही केला आहे.
दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी देखील मैदानात उतरली आहे. काल काॅंग्रेसकडून या पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु महाविकास आघाडीकडून अदयापही आपला या निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही.
Read also
- “नाराजी, खंत, तरीही आदेश मान्य, हेमंत रासनेंनी घेतली शैलश टिळकांची भेट”
- “नाना भाऊ काॅंग्रेसमध्ये राहुन भाजपचं उघडपणे काम करताहेत,” राष्ट्रवादीचा नाना पटोलेंवर आरोप
- “ठाकरेंच्या रिफायनरी विरोधामुळे कोकणाने 1 लाखांचा रोजगार गमावला,” फडणविसांचा गंभीर आरोप
- “भाजपने अंधेरीत उमेदपणा दाखवला, तोच आता आघाडीने दाखवावा”, पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र
- “त्यांनी आता साधा नागपुरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा”, एकनाथ खडसेंनी डिवचलं