मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत वादळी सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तब्बल तीन दिवस ही सुनावणी न्यायालयात होणार असून निवडणुक आयोगाबाबत ठाकरेंनी केलेल्या याचिकेवर उद्या होणार आहे. त्याआधी शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीत एकनाथ शिंदें यांच्यावर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असतांना त्यांना राज्यपालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कशी दिली ? असा सवाल कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे.
हेही वाचा..“आसाम मध्ये बसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले”? न्यायालयात ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
आज पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हीप न पाळणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाई झाली असती तर आताच्या सरकारचे तेव्हाच्या अध्यक्षांना प्रस्तावावर निर्णय घेऊ दिला नाही, असे सांगितले. याव घटनापीठाने जुने अध्यक्ष की नवे, आता तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षित आहे, नक्की काय करावे असा सवाल केला.
हेही वाचा…““कसब्यातून निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा सात मजली करणार”, हेमंत रासनेंची मोठी घोषणा
यावर कलिप सिब्बल यांनी न्यायालयाच्या निर्णयामुळे हा पेच निर्माण झाला आहे. आता हा प्रस्ताव गेला तर राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रकरण जाईल. ते अध्यक्ष आहेत. त्यांनी न्युट्रल रहायला हवे. ते जे काय निर्णय घेतील त्या विरोधात कोर्टात येऊ शकतात. असे सुचविले. यावर घटनापीठाच्या जजमध्ये चर्चा झाली. तसेच जुन महिन्यात १६ आमदारांवर अपात्रतेची नोटीस विधानसभा उपाध्यक्षआंनी बजावली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना उत्तर दाखल करण्यास १२ जुलैपर्यंतच अवधी दिला होता. मात्र अद्यापही या आमदारांनी अपात्रतेच्या नोटिसाला उत्तर दिले नसल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा..““पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभावाची भीती, म्हणूनच पाच मंत्री पुण्यात,” थोरांताचा भाजपवर हल्लाबोल
अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असलेल्या शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. शिंदे यांच्यासह इतर आमदार अपात्र ठरल्यास पक्षाच्या निवडणुक चिन्हाचे काय, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तसेच मंत्री असताना शिंदे यांनी एकही वक्तव्य आघाडीविरोधात केले नाही, मग अचानक असे काय झाले असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित करत विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
Read also
- हेही वाचा..“पोटनिवडणुकांमध्ये लोकांचा आशीर्वाद आम्हालाच मिळणार”, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
- हेही वाचा…“युवराज पार्थ पवार यांच्यासाठी मावळ ‘सेफ’ करण्याची रणनिती”
- हेही वाचा..मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून मला मारण्याची सुपारी, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
- हेही वाचा..““आश्वासने पुर्ण करू शकलो नाही तर माझ्यावर खटला दाखल करा,”, अपक्ष उमेदवार सिद्दीकभाई शेख यांनी जाहीर केला आपला जाहीरनामा
- हेही वाचा..“आता विकास हवा, तर बॅट चा नवा पर्याय निवडा..! निळ्या शक्तीची ताकद दाखवा”, अपक्ष उमेदवार किशोर काशीराम यांचं आवाहन