पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपल्या उमेदवारांसाठी सभा, रॅली, बैठका घेऊन प्रचार करतांना दिसत आहेत. यातच काल महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत झाले होते. यावेळी कसब्यात आमचा १०० टक्के विजय होईल. असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत स्थानिकांवरील अविश्वास हेच राष्ट्रवादीच्या अपयशाचे कारण..!
कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. रवींद्र धंगेकरांसाठी आघाडीचे सर्व कार्यकर्ते मनापासून रात्रंदिवस काम करीत आहेत. सध्या भाजपच्या विरोधात जनमत गेलेलं असून हीच वस्तुस्थिती आहे. त्याचा परिणाम देखील येत्या काही काळात दिसून येईल. असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. कसब्यात भाजपचे पाच मंत्री पोटनिवडणुकीसाठी आले आहेत. त्यांना कुठतरी भीती वाटत आहे. त्यामुळेत ते आलेत. असंही बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, ठाकरेंची पुढची भूमिका ठरली “?
कसबा पेठ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र यांच्या प्रचारासाठी आघाडीचे नेते काल पुण्यात एकवटले होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काल भव्य बाईक व रोड शो आयोजित करण्याात आला होता. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद रवींद्र धंगेकरांना यावेळी मिळाला. याच पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहेत.
Read also
- हेही वाचा..“कसब्यात प्रचंड प्रतिसाद, आपला विजय निश्चित”, हेमंत रासनेंच्या पदयात्रेत पंकजा मुंडेंचं विधान
- हेही वाचा..““आपल्याला कसबा बदलून दाखवायचा आहे आणि तो आपण बदलणारच,”
- हेही वाचा…कसब्यात भाजपाचा विजयाचा संकल्प.! संजय काकडे यांच्या वतीने भव्य विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन
- हेही वाचा…““२०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा”, चंद्रकांत पाटलांचं आवाहन
- हेही वाचा..“२०२४ च्या निवडणुकीनंतर ठाकरेंसोबत फक्त किंचित सेना असेल”, भाजपने ठाकरेंना डिवचलं