पुणे : पिंपरी- चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ अजित पवार यांचा काडीचाही विश्वास नाही. क्षमता असतानाही स्थानिक पदाधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवल्यामुळे अंतर्गत नाराजी असून, काहीजण ‘तटस्थ’ भूमिकेत दिसत आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थदादा पवार यांना राष्ट्रवादीने मावळ लोकसभा मतदार संघातील तिकीट दिले होते. त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादीची संपूर्ण यंत्रणा पिंपरी-चिंचवडमध्ये कामाला लागली होती. पार्थ यांना पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी अक्षरश: कंबर कसली होती. त्यासाठी प्रदेश पातळीवरील नेते, पदाधिकारी यांनी शहरात ठाण मांडले होते. परिणामी, स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते कमालीचे संथ झाले. प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना अजित पवार स्वत: फोन करुन काम करा, लीड मिळाले पाहिजे, असे आदेश देत होते. त्यामुळे त्या निवडणुकीत नकारात्मक परिणाम दिसला.
हेही वाचा..कसब्यात आज राजकीय वाकयुद्ध..! शिंदे अन् फडणवीस तर दुसऱ्या बाजूला अजित पवार, बाळासाहेब थोरात
पिंपरी आणि चिंचवडमध्येसुद्धा पार्थ पवारांपेक्षा खासदार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य मिळाले. या पराभवाचे कारण केवळ आपल्याच शिलेदारांवर असलेला कमालीचा अविश्वास होता, असे जाणकार सांगतात.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानेही अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे संतापलेल्या अजित पवार यांनी संपूर्ण यंत्रणाला २०१९ प्रमाणे पुन्हा कामाला लावली. पवार यांचे तीन स्वीय सहायक पिंपरी-चिंचवडमध्ये ठाण मांडून आहेत. त्यावर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर निर्णायक जबाबदारी सोपवण्यातआली. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांचा प्रचार यंत्रणेतील वरचष्मा कमी झाला. ही बाब स्थानिक नेत्यांना रुचलेली नाही.
हेही वाचा…“पंकजा मुंडे हेमंत रासनेंसाठी काढणार पदयात्रा, कसब्यात आज सभांचा धडका “
तसेच, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची कोंडी करण्यासाठी त्यांचे समर्थन करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अजित पवार स्वत: फोन करुन संपर्क करीत आहेत. महापालिका निवडणुकीत तिकीट देतो, महत्वाच्या पदावर संधी देतो, अशी आमिषे देवून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचे काम करण्याची सूचना करीत आहेत. याची चर्चा चिंचवडमध्ये जोरात रंगली असून, अजित पवार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची पुनरावृत्ती करण्याची चूक करीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा..“तर उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल”, आमदाराचा मोठा दावा
कलाटेंना सहानुभूती आणि काटेंचा पाय खोलात
मविआचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांना निवडून आणण्याऐवजी बंडखोरी केलेले उमेदवार राहुल कलाटे यांना कमीत-कमी मते पडावीत. यासाठी राष्ट्रवादीचे नेते काम करीत आहेत, असे चित्र आहे. त्यातच अजित पवार स्वत: कॉल करुन पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या चूका दाखवत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, राहुल कलाटेंकडे सहानुभूती वाढली आहे. परिणामी, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, ठाकरेंची पुढची भूमिका ठरली “?
- हेही वाचा…उध्दव ठाकरेंच्या आधी एकनाथ शिंदेंनी गाठलं निलम गोऱ्हेंचं घर, निलम गोऱ्हेंना आज मातृशोक
- हेही वाचा…“राणेंचे दोन चिल्लर चार आणे भेकड, टिल्ल्यांनो, अजित पवारांचं नाव घेण्यापुर्वी 1000 विचार करा,” राष्ट्रवादीने डिवचलं
- हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीवरून आनंद दवेंच्या सहकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप, म्हणाले…”
- हेही वाचा..““एकनाथ शिंदेंनी आता त्यांचा ‘बाप’ ही बदलला, त्यांचा नाव बाप अमित शहा “