पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कसब्यात आज दिवसभर राजकीय नेत्यांचा वावर असणार आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह युतीच्या नेत्यांची एकत्रित सभा होणार आहे. तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आघाडीकडून रोड शो आणि बाईक रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज कसब्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे”, शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
महायुतीमधील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, पतित पावन संघटना, शिवसंग्राम, आठवले गट हेमंत रासने यांच्यासाठी सभा घेणार आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसब्यात सभा घेणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. अलिकडेच शिंदेंना निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्याने शिंदे प्रचारसभेत काय बोलणार ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
हेही वाचा..““अमित शहा साहेब, पुण्यात येऊनही कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं”
दुसऱ्या बाजूला रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून बाईक रॅली आणि रोड शो चं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे. आज सांयकाळी पाच वाजता याला सुरूवात होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी येत्या 26 फेब्रवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जशी जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसा तसा प्रचाराचा जोरही वाढवला जात आहे.
Read also
- हेही वाचा…“पंकजा मुंडे हेमंत रासनेंसाठी काढणार पदयात्रा, कसब्यात आज सभांचा धडका “
- हेही वाचा..“तर उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल”, आमदाराचा मोठा दावा
- हेही वाचा..“अन् क्रिकेटपटू जागा झाला, कसब्यात हेमंत रासनेंची प्रचारादरम्यान मैदानात जोरदार फटकेबाजी,”
- हेही वाचा..““नाराजी दुर झुकारून टिळक बाप-लेक लागले कामाला, पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासनेंसाठी उतरले मैदानात”
- हेही वाचा..प्रचाराच्या रणधुमाळीत काॅंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना करावी लागणार न्यायालयाची वारी