पुणे : पुण्यात सध्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी या पोटनिवडणुकांकडे विशेष लक्ष दिलं आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले सातत्याने या पोटनिवडणुकांचा आढावा घेतांना दिसत आहेत. यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा असून आज ते खासदार गिरीश बापट यांची भेट घेणार आहेत.
हेही वाचा..“लहानपणी आणीबाणीबद्दल ऐकलं होतं, पण..;” निवडणुक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
मागील काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट आजारी आहेत. आजारी असतांना देखील त्यांनी अलिकडे झालेल्या हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. यातच आज अमित शहा रात्री नऊ वाजता खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. त्यामुळे नकळतपणे या भेटीनंतर हेमंत रासने यांची ताकद वाढणार असून विरोधकांमध्ये धास्ती भरली आहे.
हेही वाचा..“धनुष्यबाण गेल्यानंतर आता ‘मशाल’ही ठाकरेंकडून जाणार” निवडणुक आयोगाचा आणखी एक धक्का
अमित शहा पुण्यात पोटनिवडणुकांसाठी कोणतही सभा घेणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यातच देशातील भाजपच्या राजकारणातील अमित शहा यांना ‘चाणक्य’ म्हणून ओळखलं जातं. अमित शहा पुण्यात येणार म्हणजे काहीतरी धमका होणार, हे विरोधकांना चांगलचं ठाऊक आहे. त्यामुळे ते गिरीश बापटांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पोटनिवडणुकांचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“उद्धव ठाकरेंनंतर आता अजित पवारांचा नंबर”, भाजप नेत्यांचं सुचक विधान
दरम्यान. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं काल नागपुर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. त्यानंतर ते आज पुण्यात दाखल झाले असून सायंकाळी पंडीत फॉर्म्स याठिकाणी मोदी@20 या पुस्तकांचं अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. ते रात्री ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन गिरीश बापटांच्या घरी जाणार आहेत.
Read also
- हेही वाचा..साहेबांच्या आदेशानुसार हेमंत रासने जगतापांना मनसेचा पाठिंबा, टिकाकारांना मनसेचं सडेतोड उत्तर
- हेही वाचा..“निवडणुक आयोगाचा निर्णय, राज्यपालांचा शपथविधी, राज्यातील राजकारणाला वेगळं वळण”
- हेही वाचा..““बाळासाहेबांचा जुना रूप उद्धव ठाकरेमध्ये आलं, कार च्या बोनेटवर ठाकरेंची मुंबईत सभा
- हेही वाचा…“बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता, ते आज पुन्हा एकदा कळलं”
- हेही वाचा..“‘भगवा जाणीव’ आंदोलनाद्वारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची नवी ‘स्टंटबाजी’?