पुणे : काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे प्रचार करताना मनसेच्या कार्यालयात गेले होते. यावरून उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आता मनसेने पत्रक काढत स्पष्टीकरण दिलं आहे. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे, असं स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आलं आहे.
हेही वाचा..“धनुष्यबाण गेल्यानंतर आता ‘मशाल’ही ठाकरेंकडून जाणार” निवडणुक आयोगाचा आणखी एक धक्का
पुणे मनसे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. मनसेचे स्पष्टीकरण घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे दोन मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले.
हेही वाचा..“उद्धव ठाकरेंनंतर आता अजित पवारांचा नंबर”, भाजप नेत्यांचं सुचक विधान
खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीच कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात अश्विनीताई जगताप यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे.
हेही वाचा…“शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका,” उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये. असं त्यात म्हटलं आहे.
Read also
- “निवडणुक आयोगाचा निर्णय, राज्यपालांचा शपथविधी, राज्यातील राजकारणाला वेगळं वळण”
- हेही वाचा..““बाळासाहेबांचा जुना रूप उद्धव ठाकरेमध्ये आलं, कार च्या बोनेटवर ठाकरेंची मुंबईत सभा
- हेही वाचा…“बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता, ते आज पुन्हा एकदा कळलं”
- हेही वाचा..“‘भगवा जाणीव’ आंदोलनाद्वारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची नवी ‘स्टंटबाजी’?
- हेही वाचा..“लहानपणी आणीबाणीबद्दल ऐकलं होतं, पण..;” निवडणुक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया