पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार अमोल कोल्हे यांना चार वर्षांत आजच ‘भगवा जाणीव’ आंदोलनाची आठवण झाली. गेल्या तीन वर्षांत शिवजयंती महोत्सवाला शिवनेरी गडावर न फिरकलेल्या खासदारांना अचानक साक्षात्कार कसा झाला, अशी खरमरीत टीका भाजपा नेते आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी केली आहे. शिवनेरी गडावर कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकवण्यात यावा. या करिता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.तसेच, दि. १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शासकीय शिवजयंती महोत्सवावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. याबद्दल शिरुर लोकसभा मतदार संघातील नागरिकांसह शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा..‘शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाला मिळताच, राजकीय गणितं बदलली, 2024 ला शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी?
डॉ. अमोल कोल्हे यांना स्थानिक खासदार म्हणून प्रतिवर्षी निमंत्रित केले जाते. मात्र, गेल्या तीन वर्षांत कोल्हे जयंती महोत्सवाकडे फिरकले नाहीत. अचानक त्यांना जाग आली. गेली तीन वर्षे अशाच प्रकारे गडाखाली बसून शिवप्रेमींसोबत भगवा घेवून गडावर गेले असते, तर त्यांच्याप्रति आदर वाढला असता. आता ते विरोधासाठी विरोध करीत असतील, तर त्यांना आपण काय समजवणार? असा सवालही अशा बुचके यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा..“शिवसेना अन् धनुष्यबाण शिंदे गटाला, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके म्हणाले की, मी या तालुक्याचा आमदार आहे. त्यामुळे निश्चितपणे मी शिवजयंती कार्यक्रमाला गडावर जाणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी शिवप्रेमींची भावना कळवली आहे. शिवजयंतीसाठी पाहुणे येणार आहेत. माझ्या मतदार संघात शिवनेरी असल्यामुळे मला त्यांचे स्वागत करावे लागणार आहे. पण, मी व्यक्तीगत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भूमिकेशी सहमत आहे. कारण, गडावर भगवा ध्वज उभारण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्याला यश मिळत नाही. तरीही माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी शिवजयंती कार्यक्रमात सहभागी व्हावे.
हेही वाचा..‘“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, लोकप्रतिधी, आमदार, खासदार होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. केंद्रात थेट मागणी करुन डॉ. कोल्हे भगवा ध्वज कायमस्वरुपी उभारण्याबाबत मागणी करु शकतात. त्यांनी मागणी केली असेल, त्याला वेळ गेला असेल. पण, त्यामुळे शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे शोभणारे नाही. आपल्या अस्मितेसाठी आपण एकत्रितपणे पाठपुरावा करु. पण, ही आंदोलनाची वेळ नाही. खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवजयंतीवर ‘बहिष्कार’ हा शब्द मागे घ्यावा. कारण, शिवरायांबाबत प्रत्येकाची भावना आदराची आहे. आंदोलनासाठी अनेक जागा आहेत. शिवजन्मभूमीत शासकीय शिवजयंती सोहळ्याबाबत अशा शब्दांचा वापर करु नये, अशा शब्दांत माजी आमदार सोनवणे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचा समाचार घेतला आहे.
Read also
- हेही वाचा..“लहानपणी आणीबाणीबद्दल ऐकलं होतं, पण..;” निवडणुक आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“धनुष्यबाण गेल्यानंतर आता ‘मशाल’ही ठाकरेंकडून जाणार” निवडणुक आयोगाचा आणखी एक धक्का
- हेही वाचा..“उद्धव ठाकरेंनंतर आता अजित पवारांचा नंबर”, भाजप नेत्यांचं सुचक विधान
- हेही वाचा…“शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका,” उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
- हेही वाचा..““विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठाम”, रविंद्र चव्हाण यांनी घेतली मनसेच्या नेत्यांची भेट