पुणे : हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. म्हणूनच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घेतला असल्याचे मत प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा..‘मास्टर ब्लास्टर’ आमदार सुनील शेळके चिंचवडमध्ये ठरणार ‘किंगमेकर’
राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेतल्या. तेव्हा मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप सोबत असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. चव्हाण यांनी मनसे नेते दीपक पायगुडे, बाळा शेडगे, सुशिलाताई नेटके, अजय शिंदे, प्रल्हाद गवळी (MNS leaders Deepak Paigude, Bala Shedge, Sushilatai Netke, Ajay Shinde, Prahlad Gawli ) यांच्या सह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.
हेही वाचा..चंद्रकांतदादांनी घेतली बाळासाहेब दाभेकारांची भेट; मविआची डोकेदुखी वाढणार ?
चव्हाण म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. मनसेचे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राजसाहेब दोन दिवसात पुण्यात येणार आहे, त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनाप्रमाणे काम अधिक गती घेईल. त्यामुळे कसबा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना मोठे बळ मिळाले असून विक्रमी मताधिक्याने विजय होईल असा विश्वास वाटतो.
Read also
- हेही वाचा..‘शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाला मिळताच, राजकीय गणितं बदलली, 2024 ला शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी?
- हेही वाचा..“शिवसेना अन् धनुष्यबाण शिंदे गटाला, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
- हेही वाचा..‘“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
- हेही वाचा…“मुक्ताताईंएवढचं प्रेम हेमंत रासने यांनाही मिळेल, याची खात्री”, चंद्रकांत पाटील
- हेही वाचा..“भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले”, राष्ट्रवादीची टिकात्मक पोस्ट