पुणे : कसबा पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. भारतीय जनता पक्षातील सर्वच नेते मंडळींनी पुण्यात ठाण मांडले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न देखील केले जात आहे. यातच काल खासदार गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आजारी असताना सुद्धा बापट मैदानात उतरल्याने कसब्यातील वारं फिरल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे जेष्ठ नेते संजय काकडे यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांची भेट घेतली आहे.
हेही वाचा..“थोडी ताकद लावा.. मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल;” खासदार गिरीश बापट
या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून काॅंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे. दोन्ही बाजूंनी ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असं सांगितलं जात असले तरीही नेमकी काय या भेटीत चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा..“चिंचवडमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला…महाविकास आघाडी, अपक्षासह वंचितचेही तगडे आव्हान!
बाळासाहेब दाभेकर हे स्वतः ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र काही कारणास्तव त्यांना माघार घ्यावी लागली. दाभेकर हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. मात्र इतर पक्षातून आलेल्या धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने काहीसे ते नाराज होते. दाभेकर यांनी या निवडणुकीसाठी अर्ज देखील दाखल केला होता. यातच आता या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Read also
- हेही वाचा..स्पर्श घोटाळ्यातील वादी-प्रतिवादी राष्ट्रवादीत; योगेश बहल यांची घुसमट!
- हेही वाचा..“ आव्हाडांच्या स्वीय साहाय्यकांसह चौघांना एकदिवसीय पोलीस कोठडी, मारहाण प्रकरण अंगलट
- हेही वाचा..“एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अन् शरद पवार पोटनिवडणुकीसाठी मैदानात”, पुण्यातील राजकारण तापणार
- हेही वाचा..“दुसऱ्यांची घरे फोडून स्वत:ची इमारत बांधणारे वास्तुशिल्पी म्हणत भाजपने शरद पवारांना डिवचलं,” राष्ट्रवादीनेही दिलं प्रत्युत्तर
- हेही वाचा…सत्तासंघर्षांची सुनावणी आता मंगळवारी, पाच की सात घटनापीठाकडे जाणार की, निकाल लागणार ?