पुणे : कोणतीही निवडणुक ही गंभीरतेने घ्यायची आहे. त्यासाठी आमची सर्व राजकीय यंत्रणा कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी कामाला लागली आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. तसेच त्यांनी पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुण्यातील पोटनिवडणुकांचा आढावा देखील घेतला आहे. तसेच त्यांनी खासदार गिरीश बापट यांची देखील भेट घेतली आहे.
हेही वाचा..““भाजपचे पतन थांबवण्यासाठी मोदीला महिन्याला राज्यात येऊन पोळ्या लाटाव्या लागताहेत”
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हेमंत रासने यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. येत्या 26 फेब्रवारी रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपची सगळी यंत्रणा आता कामाला लागली असून हेमंत रासने यांच्यासह पुण्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी यासाठी झोकून देऊन काम करतांना दिसत आहे.
हेही वाचा..““मनसेने रासनेंना पाठींबा दिल्यामुळे धंगेकरांचे टेन्शन वाढले, मनसेच्या पाठींब्यामुळे रासने सेफ झोनमध्ये”
कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शिंदे गटाचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील प्रचारासाठी पुणे गाठणार आहेत. तसेच स्वत: केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) १८ आणि १९ फेब्रुवारीला प्रचारासाठी पुण्यात येणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून तर सर्वस्व पणाला लावून प्रचार सुरू आहे.
Read also
- हेही वाचा..““पवार साहेबांनी धुर्त डाव टाकत राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी अजित पवारांना राजभवनावर पाठवलं”
- हेही वाचा..“शहराच्या इतिहासातील ‘सुवर्ण लक्ष्मण पर्ण’ सदैव स्मरणात..! भाजप आमदार महेश लांडगे यांची भावना
- हेही वाचा.. ED सरकारने आमदारांची फौज गुवाहाटीला पळवली, त्याबदल्यात…;” सुप्रिया सुळेंचा शिंदेंना खोचक सवाल
- हेही वाचा..पोटनिवडणुकीची रंगत वाढली…! हेमंत रासनेंसाठी महायुतीच्या नेत्यांकडून खांद्याला खांदा लावून प्रचार
- हेही वाचा..““तर शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल”, ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केला विश्वास