पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाळी केल्यानंतर राज्यातील राजकीय चित्रचं पलटून गेलं. त्यानंतर शिवसेना आणि निवडणुक चिन्हावरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राजकीय लढाई सुरू झाली. त्यामुळे मागील सहा महिन्यापासून शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार अद्यापही झालेला नाही. त्यावरून राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा..“भाऊ तुम्ही अमर आहात, एक मत आपल्या अश्विनीताईंना,” महेश लांडगेंनी मतदारांना केलं भावनिक आवाहन
आज सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या याचिकांवर सुनावणी करण्यात आली. न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. या सुनावणीत 16 आमदारांच्या याचिकांवर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. यामध्ये अरूणाचल प्रदेशमधील नबाम रबिया केसमध्ये राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची होती. तर महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष्यांची भूमिका आहे. त्यामुळे या प्रकरणाचा दाखला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला लागू होत नाही. असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.
हेही वाचा..कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, कसबा पोटनिवडणुकीवर गिरीश बापटांचं बारीक लक्ष
तसेच पक्षातील फुट आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 16 आमदारांच्या बंडखोरीवर कारवाई केली. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या सगळ्या प्रकऱणात विधानसभा उपाध्यक्ष येथे कार्यरत होते. राज्यपालांची भूमिका खुप नंतर आली. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आला असेल तर तो विधानसभेतील 29 आमदारांच्या सहमतीने यायला हवा होता. अशी भूमिका ठाकरे गटाच्या वकीलांनी मांडली.
शिंदे फडणवीस सरकारचं आजचं मरण उद्यावर जाऊ शकत ….परंतु ED सरकारचा अंत अटळ आहे.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) February 14, 2023
Read also
- हेही वाचा..” पोटनिवडणुकांसाठी राजकारणातील भाजपचा चाणक्य पुण्यात येणार, विरोधकांमध्ये भरली धडकी”
- हेही वाचा..“निवडणुकीत आपलाच विजय व्हावा,” हेमंत रासनेंसाठी भाजपची कोअर कमिठी अलर्टं मोडवर
- हेही वाचा..“शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना तोडण्यासाठी, बंडखोर आमदार भाजपमध्ये जाणार ?”
- हेही वाचा..“तर तुम्ही रोज बदाम खा, पहाटेच्या शपथविधीवरून ट्विटवर रंगलं, राष्ट्रवादी अन् भाजप ट्विटवार”
- हेही वाचा..चिंचवडमध्ये मतविभाजनाची धास्ती, राहुल कलाटे भाजपची की आघाडीची मतं घेणार? जोरदार फिल्डिंग