पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रचाराचा धुराळा उडवला जात आहे. मात्र अपक्ष अजूनही मैदानात प्रचारासाठी उतरले नसल्याचं चित्र दिसून येत आहे. काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिंचवडमध्ये सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. याआधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राहुल कलाटे यांना दोन नंबरची मतं पडली होती. त्यामुळे मतांचं गणित साधण्यासाठी महाविकास आघाडीकडून वेगळी रणनिती आखली जात आहे.
हेही वाचा..हेमंत रासनेंसाठी शिंदे गटाची रणनिती ठरणार, आज पुण्यात महत्वाची बैठक
राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभेची 2014 साली राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तर 2019 साली शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडणुक लढवली होती. या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीपैंकी 2019 ला राहुल कलाटे यांना एक लाखांपेक्षा अधिक मत पडली होती. राहुल कलाटे यांनी त्यावेळी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला होता. आता या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे मतांची विभागणी जास्त होण्याची भीती भाजप आणि महाविकास आघाडीला वाटू लागली आहे.
हेही वाचा..“महापालिकांच्या निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत,” एकनाथ शिंदेंचं सुचक वक्तव्य
कालच्या झालेल्या सभेत अजित पवार यांनी राहुल कलाटे यांच्यावर निशाणा साधला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे, मी आणि आमच्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी राहुल कलाट्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी माघार घेतली नाही. त्यांना मागच्या निवडणुकीत 1 लाखांपेक्षा मत पडलीत, परंतु त्यांना शिवसेनेचा पाठिंबा होता. त्यामुळे आता गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. असं अजित पवार यांनी कालच्या सभेत म्हटलं.
हेही वाचा..““जो गेला तो कावळा, अन् जो राहिला तोच मावळा,” अहिरांनी राहुल कलाट्यांना धु धु धुवलं
दरम्यान, ऐनवेळी राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज सादर केल्याने महाविकास आघाडीमध्ये गोंधळ उडाला. राहुल कलाट्यांना अर्ज मागे घेण्यास आघाडीच्या नेत्यांनी विनंती केली. मात्र निवडणुक लढण्यास कलाटे ठाम राहिलेत. यातच आता शिवसेनेची मतं कलाट्यांना न जाता ती सर्व नाना काटे यांना यावीत, यासाठी अजित पवारांनी आदित्य ठाकरेंना फिल्डिंग लावण्यास सांगितलं आहे. तर दुसरीकडे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील काॅंग्रेसची मत आघाडीलाच कशी मिळतील, याची चर्चा करण्यात आली. त्यामुळे येत्या 02 मार्चला कोणाच्या बाजूने निकाल लागणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा..“भाऊ तुम्ही अमर आहात, एक मत आपल्या अश्विनीताईंना,” महेश लांडगेंनी मतदारांना केलं भावनिक आवाहन
- हेही वाचा..कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, कसबा पोटनिवडणुकीवर गिरीश बापटांचं बारीक लक्ष
- हेही वाचा..“200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं भाजपचं सुक्ष्म नियोजन”, भाजपच्या बड्या नेत्यांच विधान
- हेही वाचा..“गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, तयार रहा,” अजित पवारांनी रणशिंग फुंकले
- हेही वाचा..काॅंग्रेस भवनात काॅंग्रेसचेच दोन नेते एकमेकांत भिडले, रविंद्र धंगेकरांना याचा फटका बसणार का?