मुंबई : राज्यात उद्या धनुष्यबाण आणि शिवसेना नेमकी कुणाची यावर निवडणुक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. यातच शिंदे गटातील 16 आमदारांवर निलंबणाची टांगती तलवार आहे. यातच विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य केलं जात आहे. यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी महत्त्वपुर्ण विधान केलं आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा..“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानायला सध्या कोणीच तयार नाहीत”
राज्याच्या सत्ता संघर्षाची सुनावणी येत्या काही दिवसात पुर्ण होईल. कायद्यानुसार निकाल दिला गेल तर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील आणि हे सरकार बेकायदेशीर असल्याचं सिद्ध होईल. असं जंयत पाटलांनी सांगितलं आहे. तसेच सरकार अस्थितर असून त्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार आहे. असं देखील जंयत पाटलांनी म्हटलं आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा..जातीयवादाच्या राजकारणाला धुडकावत ब्राह्मण समाज देणार हेमंत रासने यांना साथ ?
जंयत पाटील साहेब आपण भाजपची चिंता करू नये. दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी सुक्ष्म नियोजन केले आहे. तुम्हाला, महाविकास आघाडीला विधानसभेसाठी उमेदवार मिळेल की नाही, याची चिंता करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थिर असून महाविकास आघाडी अस्थिर झाली आहे. असा टोला बावनकुळे यांनी जंयत पाटलांना लगावला आहे.
जयंत पाटील साहेब आपण भाजपची चिंता करू नये. दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले. तुम्हाला, माविआला विधानसभेसाठी उमेदवार मिळेल की नाही, याची चिंता करा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार स्थिर असून मविआच अस्थिर झाली आहे.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 13, 2023
Read also
- हेही वाचा..“गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, तयार रहा,” अजित पवारांनी रणशिंग फुंकले
- हेही वाचा..काॅंग्रेस भवनात काॅंग्रेसचेच दोन नेते एकमेकांत भिडले, रविंद्र धंगेकरांना याचा फटका बसणार का?
- हेही वाचा..हेमंत रासनेंसाठी शिंदे गटाची रणनिती ठरणार, आज पुण्यात महत्वाची बैठक
- हेही वाचा..“महापालिकांच्या निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत,” एकनाथ शिंदेंचं सुचक वक्तव्य
- हेही वाचा..““जो गेला तो कावळा, अन् जो राहिला तोच मावळा,” अहिरांनी राहुल कलाट्यांना धु धु धुवलं