मुंबई : उद्या निवडणुक आयोग धनुष्यबाण आणि शिवसेना संदर्भात सुनावणी होणार आहे. याआधी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणुक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद केला आहे. उद्या या प्रकरणाबाबत निवडणुक आयोग निकाल देण्याची शक्यता आहे. त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महानगरपालिकाच्या निवडणुकांच्याबाबत महत्त्वपुर्ण भाष्य केलं आहे.
हेही वाचा..“पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात, चिंचवडमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार
काही लोक तर सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देत आहेत. आधी उच्च न्यायालयाला सल्ले देत होते. खरं तर निवडणुकांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कधीही निवडणुका घेण्यासाठी आम्ही तर तयार आहोत. हे चारपाच महिन्यात एवढं करू शकतात. यांना संधी दिली तर काय करू शकतील. हे लोकांना कळून चुकलं आहे. असं सुचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी टीव्ही9 च्या कार्यक्रमात केलं आहे.
हेही वाचा..“महाराष्ट्रात गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद..”जाता जाता कोश्यारींचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
मागील काही वर्षापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. यासंदर्भातही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यातच राज्यातील शिवसेना आणि धनुष्यबाण संदर्भातील प्रकरणही प्रलंबित असल्याने निवडणुका टाळल्या जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे उद्याच्या निकालावरून पुढील राजकीय गणितं आखली जाणार आहेत.
Read also
- हेही वाचा..““जो गेला तो कावळा, अन् जो राहिला तोच मावळा,” अहिरांनी राहुल कलाट्यांना धु धु धुवलं
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानायला सध्या कोणीच तयार नाहीत”
- हेही वाचा..जातीयवादाच्या राजकारणाला धुडकावत ब्राह्मण समाज देणार हेमंत रासने यांना साथ ?
- हेही वाचा..“ठाण्यात राष्ट्रवादीला मोठ खिंडार, 6 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
- हेही वाचा..““गुलाल आपलाच..! सगळ्या पक्षाची ताकद लावा अन् रविंद्र धंगेकरांना विजयी करा”, अजित पवार