ठाणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशांचा प्रमाण वाढलं आहे. यातच मागील काही दिवसापासून ठाण्य़ात राष्ट्रवादीला मोठ खिंडार पडणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे काल राष्ट्रवादीच्या 6 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचा मोठा फटका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना बसला आहे.
हेही वाचा..““काॅंग्रेसमध्ये कोणतीही खदखद नाही, भाजपकडून काॅंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न,” नाना पटोले
ठाण्यात 6 माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धक्का बसला मानल्याचं जात आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी यावेळी ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. हनुमंत जगदाळे यांनी लोकमान्यनगर इथं शक्तीप्रदर्शन करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये हणमतं जगदाळे, राधाबाई जाधव, दिंगबर ठाकूर, वनिता घोगरे, संभाजी पंडीत, संतोष पाटील, सुधाकर नाईक, पुरूषोत्तम ठाकूर, राजा जाधव, संदीप घोगरे, मंगेश ठाकुर यांचा समावेश आहे.
हेही वाचा..“डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास होईल,” मोदींचा मुंबईत हल्लाबोल
या प्रक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, निर्णयाची धडाडी, विकासाची संगत, आतापासून आम्ही शिंदे साहेबांसोबत, असा संकल्प करून ठाण्यातील लोकमान्य नगर विभागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच आपल्यावरील टिकेला किंमत देण्यापेक्षा टिकाकारांना आपल्या कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न करत असून त्यानुसारच वैयक्तिक स्वार्थ न ठेवता विकासाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Read also
- हेही वाचा..““गुलाल आपलाच..! सगळ्या पक्षाची ताकद लावा अन् रविंद्र धंगेकरांना विजयी करा”, अजित पवार
- हेही वाचा..“पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात, चिंचवडमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार
- हेही वाचा..“महाराष्ट्रात गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद..”जाता जाता कोश्यारींचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
- हेही वाचा..““‘एक अकेला सबपे भारी’ म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले”
- हेही वाचा..““गुजरात काय उद्या अमेठीलाही आपला प्रकल्प गेला तर त्याचा विरोध करेन”, सत्यजीत तांबे