पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड या पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी अनेकांनी आम्हाला फोन केलेत. परंतु हे ते कोणत्या अधिकारांने आम्हाला सांगातहेत, हा खरा प्रश्न आहे. कारण याआधीही राज्यात अनेक पोटनिवडणुका लागल्या, तेव्हा त्यांना काही सुचलं नाही. यासाठी आम्ही सगळ्या घटक पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन ह्या निवडणुका लढवण्याचं ठरवलं. यातच गद्दारी करून आलेल्या सरकारला अलिकडे झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निकालावरून जनतेने त्यांना एक जागेचा अपवाद वगळता नाकारलं आहे. भविष्यात नवी पीढी घडवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना धडा शिकवला आहे. त्यामुळे याही निवडणुकांमध्ये जनता त्यांचा पराभव करेल. असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा..“डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास होईल,” मोदींचा मुंबईत हल्लाबोल
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी अजित पवार, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सध्या देशात एव्हाना महाराष्ट्रात महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. त्यामुळे ह्या पोटनिवडणुका भावनिकतेवर करण्याचे कोणतेही प्रयत्न करू नयेत, असंही अजित पवारांनी सांगितले.
हेही वाचा..आता माघार नाहीच, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी, राहुल कलाटे सत्ताधारी आणि विरोधकांचा घाम फोडणार?
शरद पवार आणि राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात मला लोकसभेसाठी खेड तालुक्यात संधी दिली होती. तर कसबा मतदार संघात काॅंग्रेसकडून नवले साहेबांना उमेदवारी दिली होती. त्याचवेळी राजीव गांधी यांच्याबाबत दुर्दैवी घटना झाली होती. त्यानंतर ह्या निवडणुका पुढे ढकलल्या अन् याठिकाणाून अण्णा जोशी निवडून आले. त्यावेळी अण्णा जोशींना विधानसभेचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मग शरद पवार यांनी वसंतराव थोरातांना उमेदवारी दिली अन् त्यावेळी ते विजयी झाले. अशी आठवणही अजित पवार यांनी यावेळी काढली.
हेही वाचा..“आम्ही ज्वारी, बाजरीच भाकर खातो, पण काही लोकांसाठी हे नवं आहे”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
दरम्यान, विचार करून काॅंग्रेसने रविंद्र धंगेकरांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी मागच्या वेळी मनसेकडूनही चांगली लढत दिली होती. यातच मागे अनेक अपक्ष म्हणून उमेदवार उभे राहत होते. याचा फायदा भाजपला होत होता. त्यामुळे या पोटनिवडणुकांमध्ये सगळ्या पक्षाची ताकद लावा अन् रविंद्र धंगेकरांना विजयी करा. रविंद्र धंगेकर साधा कार्यकर्ता असून अडअडचणींना धावुन जाणारा आहे. तसेच आगामी महापालिकेच्या तिकिटांवरून कोणीही शंका घेऊ नये. त्या जागांचा वाटप व्यवस्थितरित्या केलं जाईल. असंही अजित पवार म्हणाले.
Read also
- हेही वाचा..“पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात, चिंचवडमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार
- हेही वाचा..“महाराष्ट्रात गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद..”जाता जाता कोश्यारींचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
- हेही वाचा..““‘एक अकेला सबपे भारी’ म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले”
- हेही वाचा..““गुजरात काय उद्या अमेठीलाही आपला प्रकल्प गेला तर त्याचा विरोध करेन”, सत्यजीत तांबे
- हेही वाचा..““काॅंग्रेसमध्ये कोणतीही खदखद नाही, भाजपकडून काॅंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न,” नाना पटोले