पुणे : चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार न घेतल्याने आता त्याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. भाजपकडून अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते नाना काटे रिंगणार आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र यावर आता शिक्कामोर्तेब झाला असून राहुल कलाटे, नाना काटे आणि अश्विनी जगताप अशी थेट तिरंगी लढत चिंचवड पोटनिवडणुकीत होणार आहे.
हेही वाचा..उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर कलाट्यांच्या भेटीला, माघार घेणार की थेट लढणार ?
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना दोन्ही वेळेस राहुल कलाटे यांनी जोरदार लढत दिली होती. त्यात 2014 साली राष्ट्रवादीने तर 2019 च्या विधानसभेत शिवसेनेने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. 2019 साली जनतेने 1 लाखांपेक्षा अधिक मत राहुल कलाटे यांना दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात येईल. अशी माहिती समोर येत होती. परंतु राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिल्याने कलाटे नाराज झाले होते.
हेही वाचा..“मोदी मुंबईत आले अन् आख्खा देश लावला तरी मुंबई महापालिका भाजप जिंकू शकत नाही”
राहुल कलाटे यांना आज उद्धव ठाकरे यांनी देखील फोन करून माघार घेण्याची विनंती केली होती. मात्र राहुल कलाटे यांनी यापोटनिवडणुक माघार न घेतल्याने महाविकास आघाडी , भाजप आणि अपक्ष अशी थेट लढत होणार आहे. राहुल कलाटे यांनी मागील काही दिवसांपुर्वी चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी मोठ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता.
Read also
- हेही वाचा..“आम्ही ज्वारी, बाजरीच भाकर खातो, पण काही लोकांसाठी हे नवं आहे”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
- हेही वाचा..“मावळ लोकसभेसाठी सुनील शेळकेंचे चिंचवडमधून ‘रणशिंग’ – विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना आव्हान
- हेही वाचा..कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात, अमित शहांचा 19 तारखेला पुणे दौरा
- हेही वाचा..“उद्धव ठाकरे साहेबांचा अनादर मी करणार नाही,” उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून कलाट्यांचं सुचक वक्तव्य
- हेही वाचा..कसब्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्षांना राजकीय पक्षांकडून विनंती, भाजप, आघाडीचे नेते लागला कामाला