पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीची जागा महाविकास आघाडीने राष्ट्रवादीला सोडल्याने शिवसेना पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे नाराज झाले. त्यानंतर त्यांनी चिंचवडच्या पोटनिवडणुकीकरीता अपक्ष म्हणून अर्ज सादर केला. त्यामुळे याठिकाणी आता भाजप, महाविकास आघाडी आणि राहुल कलाटे अशी लढत होण्याची शक्यता असतांना शिवसेनेचे आमदार सचिन अहिर उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन राहुल कलाट्यांच्या भेटीला आले आहेत. त्यावर आता राहुल कलाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..““आपल्याकडे आता गुरू आणि वडिल चोरणारी टोळी तयार झाली”, उद्धव ठाकरेंची पुन्हा शिंदेंवर टिका
सचिन अहिर यांनी माझी आज भेट घेतली. त्यानंतर माझं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. यातच उद्धव ठाकरे यांचा कोणताही अनादर करण्याचा विचार माझ्या मनात नाहीय. परंतु उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा की नाही. त्याचा निर्णय मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून घेणार आहे. असं राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज राहुल कलाटे काय निर्णय घेतात. त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
हेही वाचा..“भाजपमधील ही काही माझे मित्र, नेते मला मदत करताहेत”, रविंद्र धंगेकरांची प्रचाराला सुरूवात
“आपल्या विचारांना प्रभावी झालेले आणि त्यांचे राजकीय भवितव्य अंधारी होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे. पक्षप्रमुखांनी देखील त्यांना सांगितलं आहे की, तुम्ही तरूण आहात, आता जे काही झालं आहे, परंतु आगामी काळात महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा पक्षप्रमुख असतील, एक हमी घेऊन तुम्हाला भविष्यकाळात राजकीय दृष्टीने कशा पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल, असा निरोप आमच्या पक्षप्रमुखांचा घेऊन राहुल कलाटे यांच्याकडे गेलो होतो. यातच तुम्हाला चांगला राजकीय भवितव्य असल्याने तुम्ही यातून माघार घ्यावी,” अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली असल्याचं सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांना केली आहे.
हेही वाचा..““या घटना मागचा मास्टरमाईंड शोधून त्यावर कडक शासन करा,” त्यावरून अजित पवार राज्य सरकारवर संतापले
दरम्यान, राहुल कलाटे यांनी काल उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, परंतु त्यांचं काल बोलणं झालं नाही. परंतु आज उद्धव ठाकरे यांना राहुल कलाटे यांच्याशी बोलणं झालं आहे. पक्षप्रमुखांनी देखील त्यांना विनंती केली आहे. त्यानंतर राहुल कलाटे यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी तातडीने बैठक घेतली आहे. त्यांचा निर्णय लवकरच आम्हाला कळवतील. तसेच आम्ही आशावादी आहोत. की ते चांगले निर्णय घेतील. असंही सचिन अहिर यांनी सांगितले.
Read also
- हेही वाचा..कसब्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्षांना राजकीय पक्षांकडून विनंती, भाजप, आघाडीचे नेते लागला कामाला
- हेही वाचा..उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर कलाट्यांच्या भेटीला, माघार घेणार की थेट लढणार ?
- हेही वाचा..“मोदी मुंबईत आले अन् आख्खा देश लावला तरी मुंबई महापालिका भाजप जिंकू शकत नाही”
- हेही वाचा..“काॅंग्रेस की संभाजी ब्रिगेड? कसब्यावरून उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, “
- हेही वाचा..राज्यातील आमदारांवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक, 10 ते 15 आमदारांवर भाजपचं लक्ष्य