पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उभे असलेले महाविकास आघाडीचे काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगकेर यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यांनी काल ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी देवी मंदीर आप्पा बळवंत चौक येथून केली. यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काॅंग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेतला.
हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला, मुनगंटीवार, पाटील, मिसाळ भाजपची फौज मैदानात
जिथे जाईल तिथे गर्दी, जिथे जाईल तिथे माझी माणसं. नेहरू चौक येथील व्यापारी बांधवांच्या वतीने फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये रवींद्र धंगेकर यांचं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, तीस वर्षात खरचं काही कमवले असेल तर ते पुणे शहरातील लाखो लोकांचे प्रेम कमावलं. राजकीय आयुष्यात आपला माणुस नगरसेवक व्हावा, आमदार व्हावा. ही त्यांची अपेक्षा बरोबरच आहे. निश्चितच आजवर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा रवींद्र धंगेकर त्यांची ही इच्छा देखील पुर्ण करणार. असं रवींद्र धंगकेर यांनी म्हटलं.
हेही वाचा..‘राहुल कलाट्यांना शिवसेनेकडून अजूनही अपेक्षा, सादर केले दोन अर्ज, ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष्य
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कसबा पेठतील जनतेचा आमदार म्हणून त्यासाठी नागरिकांना 24 तास 365 दिवस त्यांच्यामध्ये हजर राहणार आमदार मी बनवून दाखवणार. आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. असाच आपला विश्वास येत्या 26 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत माझ्यावर दाखवा आणि तुमच्या हक्काच्या आमदाराला विधानसभेत पाठवा असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..मोठी बातमी..! राजीव सातवर यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला
दरम्यान, आजवर ज्या ज्या नागरिकांनी त्यांचा भाऊ म्हणजे हक्काने मला आवाज दिला. त्याच्या मदतीला मी 24 तास 365 दिवस उन वारा पाऊस दिवस रात्र यापैकी कशाचीही तमा न बाळगता धावून गेलो. आज याच सर्व सहकाऱ्यांनी ही निवडणुक हाती घेतली आहे. या प्रेमाचे येत्या निवडणुकीत विजयात रूपांतर होणार, असा मला ठाम विश्वास आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..फडणवीसांच्या एका फोनमुळे टिळकांची नाराजी गेली, फडणवीसांच्या ‘त्या’ खेळीची सध्या चर्चा
- हेही वाचा..‘गडकरी, राणे, फडणवीस, मुंडे, पाटील, बावनकुळेंसह भाजपचे 40 नेते मैदानात, स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
- हेही वाचा..“मोदी-अडानी भाई भाई, भाषणाबाजी बंद करो, विरोधकांनी मोदींना घेरलं, तरी मोदी हटेना, भाषण सुरूच”
- हेही वाचा..““पटोले-थोरात वाद, “टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा”
- हेही वाचा..“महाविकास आघाडीची एक बंडाळी टळली, बाळासाहेबांनी कसब्यातून घेतली माघार