औरंगाबाद : शिवसेनेचे युवा नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) सध्या शिवसंवाद यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल नाशिक येथील या कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर ते सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले. ज्याठिकाणी (aditya thackeray) आदित्य ठाकरे यांची सभा होती. त्याच ठिकाणाच्या हाकेच्या अंतरावर काल रमाबाई आंबेडकर जंयतीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी डी.जे च्या कारणावरून कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालेला बघायला मिळाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा.. ““याचे परिणाम भोगावे लागतील”, संभाजी राजेंचा आव्हाडांना कडक इशारा
आदित्य ठाकरे (aditya thackeray) सातव्या शिवसंवाद ( shivsavand yatra ) यात्रेनिमित्त मंगळवारी सांयकाळी वैजापुर (vaijapur, aurangabad distance) तालुक्यातील महालगाव येथे आले. सभेच्याच्या दुसऱ्या बाजूला रमाबाई आंबेडकर यांच्या जंयतीचा कार्यक्रम सुरू होता. आदित्य ठाकरे यांच्या सभेला अडथळा येत असल्याचं पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डि.जे.चा आवाज बंद करायला सांगितला. मात्र समोरच्या गटाने तो आणखीच वाढवला, अन् मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी स्टेजवरून खाली उतरून तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
हेही वाचा.. “राहुल कलाट्यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी, सुनील शेळके कलाट्यांच्या भेटीला
राज्यात आता भीमशक्ती, शिवशक्ती (shivshakti and bheemshkti) यांची युती झाली आहे. मी तुमच्यासोबत आहे, तुम्हाला डीजे वाजवायचा असेल तर वाजवा, असं आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितले. त्यानंतर (aditya thackeray) आदित्य ठाकरे यांनी आपली सभा आटोपती घेतली. अन् त्याठिकाणाहून निघाले. मात्र काही कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत आपचा नेता ठरला..; उमेदवारी अर्ज सादर करणार
त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देतांना कार्यकर्त्यांची माफी मागितली असल्याचं सांगितलं. मी माईकवर बोललो, काही कारणास्तव सांऊड बंद झाला असेल. एकमेकांना समजून घ्यावे लागते. मी माईकवर माफीही मागितली. संविधानाच्या रक्षणासाठई शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलीय. काही अडचण आली असेल तर माफी मागतो. पण एवढे मोठे कारण नाही. डीजे ५ ते १० मिनिटांसाठी बंद केला असेल. पण मी माईकवर सांगितले डिजे चालू द्या. अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
आदित्य ठाकरे यांच्या सभेत दगडफेक, अंबादास दानवेंसंच पोलीस महासंचालकांना पत्र
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या कालच्या सभेत एका व्यक्तीने दगड फेकल्याची घटना घडली. सभा चालू संपल्यानंतर आदित्य ठाकरे जात असतांना त्यांच्या गाडीवर दगड मारण्यात आले असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच सदर प्रकरणी सुरक्षेमध्ये कसूर झाल्याने याबाबत कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालकांना केली आहे.
Read also
- हेही वाचा.. ठाकरेंनी सांगितलंय, पाठिंबा आपल्यालाच, त्यामुळे कलाट्यांना सांगण्याचं काम आम्ही करू, बाकी मग.. अजित पवार
- हे सर्व वाद तात्पुरते असतात, नंतर सगळं ठीक होईल, पटोले थोरातांच्या वादावर सुशील कुमार शिंदेंचा विश्वास
- हेही वाचा..“भकास झालेल्या कसब्याला सजवायला येतोय,” अभिजीत बिचुकलेंनी दाखल केला कसब्यातून अर्ज
- हेही वाचा.. तब्बल 10 हजार रूपयांची चिल्लर घेऊन पोहचला, चिंचवडच्या अपक्ष उमेदवाराची कमाल, अधिकारी पैसे मोजून थकले
- हेही वाचा..“थोरातांचा राजीनामा अजित पवारांना माहिती, पण पटोलेंना नाही, आघाडीत नेमकं काय चाललंय?”
- हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये उंचीपेक्षा मोेठे स्थान देऊ, थोरातांना भाजपची ऑफर