मुंबई : नाशिकच्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबेबाबत जे काही राजकारण झालं ते व्यथीत करणार आहे. असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत विधीमंडळ पक्षनेता पदाचा राजीनामा दिला. परंतु बाळासाहेब थोरातांनी अद्यापही मला काही सांगितलेलं नाही. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर अजित पवारांना बाळासाहेब थोरातांनी सर्व काही सांगितलं आहे.
हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांशी चर्चा व्हायला हवी होती,” सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया
रूग्णालयातून बाहेर आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी काॅंग्रेसच्या वरिष्ठांकडे राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी नाना पटोले यांच्यासोबत काम न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील जे काही राजकारण झालं ते व्यथीत करणार आहे. असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे. यातच आज बाळासाहेब थोरातांनी विधीमंडळाचा पक्षनेता पदाचा राजीनामा दिल्याने काॅंग्रेसमधील नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात वाद चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा.. “अजित पवारांचे कट्टर समर्थक, ते माजी नगरसेवक, कोण आहेत आघाडीचे उमेदवार नाना काटे”?
गेल्या काही दिवसांत बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कोणताही संपर्क झालेला नाही. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. मात्र, काॅंग्रेस हायकमांडकचे पक्षातील गटबाजीवर लक्ष आहे. माझ्याविरोधात चालू असलेल्या राजकारणावर मी लक्ष देत नाही. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. आज मी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्यांनी मला विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. पण हा माझ्या पक्षाअंतर्गत प्रश्न आहे. हा प्रश्न मी वरिष्ठांशी बोलून सोडवेल. असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा.. “पोटनिवडणुकांमध्ये आघाडीत मोठी बंडखोरी, दांभेकर अन् राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार”
दरम्यान, मागील काही महिन्यापासून नाना पटोले आणि अजित पवार यांच्यातही फटाके फोडल्याचं दिसून आलं आहे. सत्यजीत तांबेबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत पटोलेंनी अजित पवारांवर अगोदरच नाराजी व्यक्त केली होती. त्यातच असे अनेक किस्से नाना पटोले आणि राष्ट्रवादीमध्ये घडतांना दिसत आहेत. यातच आज थोरातांनी अजित पवारांचा फोन उचलला पण पटोलेंचा नाही. त्यावरून आघाडीत नेमकं काय चाललंय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Read also
- हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये उंचीपेक्षा मोेठे स्थान देऊ, थोरातांना भाजपची ऑफर
- हेही वाचा.. ““याचे परिणाम भोगावे लागतील”, संभाजी राजेंचा आव्हाडांना कडक इशारा
- हेही वाचा.. “राहुल कलाट्यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी, सुनील शेळके कलाट्यांच्या भेटीला
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत आपचा नेता ठरला..; उमेदवारी अर्ज सादर करणार
- हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड..; राहुल कलाटे, नाना काटे, की अश्विनी जगताप ?