पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी येत्या 26 फेब्रवारीला मतदान होत आहे. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून अद्यापही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतु कसब्यात भाजप आणि महाविकास आघाडीकडून आपापला उमेदवार जाहीर केला असून अर्ज देखील दाखल केले आहेत. यातच भाजपने आपला प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. यातच समाज माध्यामांवर भाजपचे नेते सक्रिय देखील झाले आहेत.
हेही वाचा….“शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”
काॅंग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना आपली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धंगेकर यांना महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेचा पाठिंबा आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी, तसेच इतर राजकीय संघटनांनी देखील आपापला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना बाळासाहेबांची शिवसेना, शिवसंग्राम, आठवले गटाचा पाठिंबा आहे. सध्या हेमंत रासने यांचे फेसबुकवर 44 हजार फॉलोअर्स असून भाजपची पाठीमागून यंत्रणा सुरू झाली आहे. या पोटनिवडणुकांसाठी त्यांचा प्रचार समाज माध्यामांतून दिसूनही येत आहेत. 2014 ला नरेंद्र मोदी यांची जादु संपुर्ण देशात चालली. यामध्ये प्रामुख्याने भाजपने समाज माध्यमांचा अगदी पद्धतशीरपणे वापर केला. त्यासाठी मोठी यंत्रणा उभी करण्यात आली. त्याचा यश भाजप आणि नरेंद्र मोदी यांना मिळलं, तोच पॅटर्न त्यांनी 2019 लोकसभेच्या निवडणुकीत राबवला अन् मोदी दुसऱ्यांचा पंतप्रधान झालेत. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपने समाज माध्यामांचा प्रभावी वापर केला. यातच सध्याच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपचे अनेक नेते समाज माध्यामांवर सक्रिय होतांना दिसत आहेत.
हेही वाचा….“नव्या सरकारने 40 आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं,” अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
मात्र दुसरीकडे काॅंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा समाज माध्यमांवरील कल कमी असल्याचं दिसून येत आहे. रविंद्र धंगेकर यांचे फेसबुकवर फक्त 1600 फॉलोअर्स आहेत. यातच भाजपने समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून निवडणुक कसं यश मिळवलं आहे. हे आपण बघत आलो आहोत. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात महाविकास आघाडी आणि काॅंग्रेसने समाज माध्यामांवर लक्ष्य देणे अधिक गरजेचे आहे. प्रचार करण्यासाठी अगदी कमी दिवस असल्याने समाज माध्यामांद्वारे काही क्षणात आपण प्रत्येकांपर्यंत पोहचण्याचं काम समाज माध्यम करत असतात. याचा थेट परिणाम निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे .
दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील सगळेच जण आता समाज माध्यामांचा वापर करतांना दिसत आहे. यातच पुण्यातील लोक टोमणे मारण्यात पटाईत असतात अशी ओळख बाहेरच्या लोकांना झाली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकांमध्ये लोकांचं लक्ष्य समाज माध्यामांवर होणाऱ्या राजकीय घडामोडींवर अधिक असणार यात काही शंका उपस्थित केली जात नाही.
Read also
- हेही वाचा.. क्या हिला दिया ना..! रजनीकांत स्टाईलने आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक टिप्पणी
- हेही वाचा..“पोटनिवडणुक बिनविरोध करा, आम्ही उमेदवारी टिळकांना देऊ..;” कसब्यातील पोटनिवडणुक चर्चेत
- हेही वाचा..“बापटांना घाम फोडणारा नेता आघाडीकडून कसब्याच्या पोटनिवडणुकीत उभा,” हेमंत रासनेंची डोकेदुखी वाढणार ?
- “हेही वाचा..रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा”, आव्हांडाचा भाजपला सवाल, आभारही मानले
- हेही वाचा..निवडणुकीसाठी अश्विनी जगतापांचा प्रसार करण्यास सुरूवात, RSS चा जगतापांना पाठिंबा