पुणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यावरून आता भाजपच्या नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडाडून टिका करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांचे पुतळे जाळून आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या युवा मोर्चाने दिला आहे. याला न जुमानता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलं आहे.
“नाराजी, खंत, तरीही आदेश मान्य, हेमंत रासनेंनी घेतली शैलश टिळकांची भेट”
पुण्यात दोन दिवसांपुर्वी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. ना शायिस्तेखान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातून शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात. हे जगासमोर आहे ना. असं आव्हाडांनी म्हटलं होतं. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टिका केली.
“नाना भाऊ काॅंग्रेसमध्ये राहुन भाजपचं उघडपणे काम करताहेत,” राष्ट्रवादीचा नाना पटोलेंवर आरोप
त्यातच आज त्यांनी पुन्हा एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातूनन कृष्णअर्जून समजावून सांगा. बाजूला काढून आदिलशाही आणि मुघल शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा. असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी भाजपचेही आभार मानले आहेत.
“ठाकरेंच्या रिफायनरी विरोधामुळे कोकणाने 1 लाखांचा रोजगार गमावला,” फडणविसांचा गंभीर आरोप
भाजपला धन्यवाद देतो. आमच्या यात्रेला प्रसिद्धी तुम्ही एका तासातच मिळवून दिलीत. आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा ह्या पहिल्याच परिषदेवर तुम्ही इतकी टिका केलीत. त्यामुळे ही यात्रा प्रत्येक घराघरात आता चर्चेचा विषय झाला आहे. बहुजनांचा इतिहास तुम्हांला का खुपतो? हेच आम्हांला समजत नाही. आमच्या परिषदेला तुम्ही घरोघरी पोहचवलात याबद्दल मी परत एकदा आपले मनापासून आभार मानतो. असं म्हणत आव्हडांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा.
दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा.
बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा
इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा#आवाज_बहुजनांचा_सन्मान_महाराष्ट्राचा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2023
Read also
- निवडणुकीसाठी अश्विनी जगतापांचा प्रसार करण्यास सुरूवात, RSS चा जगतापांना पाठिंबा
- “हेमंत रासने उद्या कसब्यासाठी अर्ज सादर करणार,” महायुतीतील या पक्षातील नेत्यांनी दिला पाठिंबा
- “शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”
- “नव्या सरकारने 40 आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं,” अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
- “मुख्यमंत्र्यांचा पटोलेंना फोन, तरीही कसब्यातून लढणार ;” नाना पटोलेंनी शड्डू ठोकला