पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनांनंतर भाजपकडून स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज हेमंत रासने कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज भाजपकडून शक्तिप्रदर्शन करीत पुण्यात रॅलीही काढण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना आपला उमेदवार घोषीत केला आहे.
“ हे पण वाचा.. शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”
गेल्या अनेक दिवसांपासून कसबा पेठ पोटनिवडणुकीवर काॅंग्रेसकडून दावा सांगण्यात येत होता. त्यावर आज नाना पटोले यांनी शिक्कामोर्तेब करत रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रविंद्र धंगेकर यांनी सुरूवातीला मनसेकडून महापालिकेची निवडून लढवून नगरसेवक झाले होते. त्यांनी राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख निर्माण केली होती. मनसेमध्ये असतांना त्यांनी अनेक पदावर कामे केली आहेत. मात्र मनसेच्या अंतर्गत वादातून त्यांनी जानेवारी 2017 साली काॅंग्रेस तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
“हे पण वाचा.. नव्या सरकारने 40 आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं,” अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
आपल्या राजकीय करिअरच्या सुरूवातीला शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर मनसेमधून दहा वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे. भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून धंगेकर यांची ओळख आहे. 2009 मध्ये मनसे तर्फे कसब्यातून विधानसभा निवडणुक लढवत असतांना धंगेकर यांनी बापटांना अक्षर:श घाम फोडला होता. त्यावेळी त्यांचा अवघ्या 7 हजार मतांनी पराभव झाला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीची राज्यात लाट असतांनाही धंगेकर यांनी आव्हान दिले होते.
“हे पण वाचा.. मुख्यमंत्र्यांचा पटोलेंना फोन, तरीही कसब्यातून लढणार ;” नाना पटोलेंनी शड्डू ठोकला
दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुक हा मतदार संघ गिरीश बापट यांचा राहिला आहे. त्यांनी या मतदार संघावर सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बापटांना लोकसभेचे तिकीट दिल्याने ते खासदार झालेत. त्यानंतर त्याठिकाणी मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. यानिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या विरोधात काॅंग्रेसचे उमेदवार अरविंदे शिंदे यांनी जोरदार लढत देत त्यांना 47 हजार 296 मत पडली होती. तर 2014 साली काॅंग्रेसने गिरीश बापट यांच्या विरोधात रोहित टिळक यांना उमेदवारी देण्यात आली होती. याच निवडणुकीत तेव्हा मनसेत असणारे रवींद्र धंगेकर यांनी देखील नशीब आजमावत 25 हजार 998 मत पारड्यात टाकली होती.
Read also
- “हे पण वाचा.. आव्हाडांची जीभ जो कापेल त्याला 10 लाखांचं बक्षिस,” भाजप नेत्यांचं खळबळजनक वक्तव्य
- हे पण वाचा.. ठरलं तर मग..! कसब्यात हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर, आघाडीकडून अधिकृत घोषणा
- हे पण वाचा..“रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा”, आव्हांडाचा भाजपला सवाल, आभारही मानले
- हे पण वाचा..निवडणुकीसाठी अश्विनी जगतापांचा प्रसार करण्यास सुरूवात, RSS चा जगतापांना पाठिंबा
- “हे पण वाचा..हेमंत रासने उद्या कसब्यासाठी अर्ज सादर करणार,” महायुतीतील या पक्षातील नेत्यांनी दिला पाठिंबा