पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीकरीता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपने पुण्यात शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. आज गणेश क्रिडा मंडळात हेमंत रासने हे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्याआधी भाजपने पुण्यात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं.
“मुख्यमंत्र्यांचा पटोलेंना फोन, तरीही कसब्यातून लढणार ;” नाना पटोलेंनी शड्डू ठोकला
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तेब करण्यात आला आहे. काॅंग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काॅंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून हेमंत धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचं पटोलेंनी म्हटलं आहे.
“नाराजी, खंत, तरीही आदेश मान्य, हेमंत रासनेंनी घेतली शैलश टिळकांची भेट”
रविंद्र धंगेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने एकत्र येण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुक जाहीर झाल्यानंतर लगेचच रविंद्र धंगेकर यांनी आपला प्रचाराची सुरूवात केली होती. आता त्यांना काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
“नाना भाऊ काॅंग्रेसमध्ये राहुन भाजपचं उघडपणे काम करताहेत,” राष्ट्रवादीचा नाना पटोलेंवर आरोप
दरम्यान, आज चिंचवड पोटनिवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी भाजपने रॅली काढली आहे. या रॅलीमधून भाजपकडून शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. तर राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना आपली उमेदवारी देण्याची शक्यता आहे. आज या पोटनिवडणुकीसाठीही उमेदवार घोषीत होण्याची शक्यता आहे.
Read also
- “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा”, आव्हांडाचा भाजपला सवाल, आभारही मानले
- निवडणुकीसाठी अश्विनी जगतापांचा प्रसार करण्यास सुरूवात, RSS चा जगतापांना पाठिंबा
- “हेमंत रासने उद्या कसब्यासाठी अर्ज सादर करणार,” महायुतीतील या पक्षातील नेत्यांनी दिला पाठिंबा
- “शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”
- “नव्या सरकारने 40 आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं,” अजित पवारांनी पुन्हा डिवचलं