जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांची जो कोणी छाटेल त्याला भाजपतर्फे 10 लाख रूपयांचं बक्षिस देण्यात येईल. असं आव्हान जालना भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याक्ष कपिल दहेकर यांनी दिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे.
“नव्या सरकारने 40 आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं,” अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
पुण्यात दोन दिवसांपुर्वी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. ना शायिस्तेखान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातून शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात. हे जगासमोर आहे ना. असं आव्हाडांनी म्हटलं होतं. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टिका केली.
“मुख्यमंत्र्यांचा पटोलेंना फोन, तरीही कसब्यातून लढणार ;” नाना पटोलेंनी शड्डू ठोकला
यातच काल जळगावमध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टरही जाळले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जळगावमध्ये आमदार सुरेश चव्हाण हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रपुरूषांचा अपमान करण्याची परंपरा ही राष्ट्रवादीची आहे. केवळ मत मागण्यासाठी राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरात असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला.
“नाराजी, खंत, तरीही आदेश मान्य, हेमंत रासनेंनी घेतली शैलश टिळकांची भेट”
दरम्यान, भाजपला धन्यवाद देतो. आमच्या यात्रेला प्रसिद्धी तुम्ही एका तासातच मिळवून दिलीत. आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा ह्या पहिल्याच परिषदेवर तुम्ही इतकी टिका केलीत. त्यामुळे ही यात्रा प्रत्येक घराघरात आता चर्चेचा विषय झाला आहे. बहुजनांचा इतिहास तुम्हांला का खुपतो? हेच आम्हांला समजत नाही. आमच्या परिषदेला तुम्ही घरोघरी पोहचवलात याबद्दल मी परत एकदा आपले मनापासून आभार मानतो. असं म्हणत आव्हडांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
Read also
- ठरलं तर मग..! कसब्यात हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर, आघाडीकडून अधिकृत घोषणा
- “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा”, आव्हांडाचा भाजपला सवाल, आभारही मानले
- निवडणुकीसाठी अश्विनी जगतापांचा प्रसार करण्यास सुरूवात, RSS चा जगतापांना पाठिंबा
- “हेमंत रासने उद्या कसब्यासाठी अर्ज सादर करणार,” महायुतीतील या पक्षातील नेत्यांनी दिला पाठिंबा
- “शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”