पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुका ह्या बिनविरोध व्हाव्या, असा सुर आता भाजपकडून केला जात आहे. तर दुसरीकडे ह्या निवडणुका बिनविरोध होणारच नाही. असा पलटवार महाविकास आघाडीकडून केला जात आहे. आज भाजपकडून दोन्ही पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेत. यावेळी भाजपच्या नेत्यांनी ह्या निवडणुका बिनविरोध करण्यात याव्या. अशी मागणी त्यांनी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पुण्यात निवडणुकांचे वारे सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडतांना दिसत आहेत.
“नव्या सरकारने 40 आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं,” अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
भाजपने मुक्ता टिळक यांच्या जागी स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासनेंना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिलीत. त्यामुळे टिळकांच्या कुटुंबाव्यतिरिक्त दुसऱ्याला उमेदवारी दिल्याने ही निवडणुक बिनविरोध होण्याचा प्रश्नच येत नाही. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर आम्ही टिळकांच्या घरात उमेदवारी देतो, ही निवडणुक बिनविरोध करावी, अन् आपला उमेदवार माघारी घ्यावा, असं चंद्रकांत पाटलांनी नाना पटोले यांना म्हटलं आहे.
“मुख्यमंत्र्यांचा पटोलेंना फोन, तरीही कसब्यातून लढणार ;” नाना पटोलेंनी शड्डू ठोकला
तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महाविकास आघाडीतील नेत्यांना विनंती केली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाना पटोले यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांशी फोनवरून संपर्क साधला. परंतु तरीही काॅंग्रेसने आपला उमेदवार घोषित करून त्यांनी आज उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी थेट लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
“नाराजी, खंत, तरीही आदेश मान्य, हेमंत रासनेंनी घेतली शैलश टिळकांची भेट”
दरम्यान, दुसरीकडे चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप Ashwini Jagtap wife of Laxman Jagtap यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील चिंचवड पोटनिवडणुकीसाठी डमी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडू अद्यापही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध होणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Read also
- “बापटांना घाम फोडणारा नेता आघाडीकडून कसब्याच्या पोटनिवडणुकीत उभा,” हेमंत रासनेंची डोकेदुखी वाढणार ?
- “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा”, आव्हांडाचा भाजपला सवाल, आभारही मानले
- निवडणुकीसाठी अश्विनी जगतापांचा प्रसार करण्यास सुरूवात, RSS चा जगतापांना पाठिंबा
- “हेमंत रासने उद्या कसब्यासाठी अर्ज सादर करणार,” महायुतीतील या पक्षातील नेत्यांनी दिला पाठिंबा
- “शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”