पुणे : सुरूवातीपासून महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागी आता महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून नाना काटे यांची ओळख राहिली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप विरूद्ध नाना काटे अशी थेट लढत होणार आहे.
हेही वाचा.. “तांबे-पटोले वादावर काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हात झटकले”, म्हणाले, त्यावर बोलणं..
नाना काटे यांची सुरूवातीपासून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आहेत. तसेच त्यांची अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी राजकीय ओळख राहिली आहे. चिंचवड विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी नाना काटे यांनी पार पाडली आहे. 2014 साली चिंचवड विधानसभा निवडणुक लढविली. राष्ट्रवादी काॅंग्रेसने उमेदवारी दिल्याने नाना काटे घरातून बाहेर पडले आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करीत त्यांनी आज उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
हेही वाचा.. “टिळक कुटुंबीयांना डावलून भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान केलाय “
सुरूवातीपासून चिंचवड पोटनिवडणुकीकरीता आयात उमेदवार नको, अशी भूमिका चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यासाठी चिंचवडमध्ये मोठ्या बैठकाही पार पडल्या. या बैठकीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार देखील उपस्थित होते. यातच राष्ट्रवादी व्यतिरिक्त उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मोठी खदखद बघायला येत होती. त्यामुळे आज नाना काटे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा.. “9 वर्षात 100 लाख कोटी भारतावर कर्ज वाढला, हाच मोदी सरकारचा अमृतकाळ आहे का ?” काॅंग्रेसचा सवाल
दरम्यान, दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीसाठी तर पहिल्यापासून महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तेब करण्यात आला. त्यामुळे राहुल कलाटे नाराज झालेत. ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून कोणत्याही परिस्थिती ही निवडणुक लढवणार असल्याचं राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा.. “पोटनिवडणुकांमध्ये आघाडीत मोठी बंडखोरी, दांभेकर अन् राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार”
- हेही वाचा.. काॅंग्रेसला 440 व्होल्टचा झटका, पटोले-थोरात वाद चव्हाट्यावर, थोरातांचा विधीमंडळ पक्षपदाचा राजीनामा
- हेही वाचा.. “नाना काटेंना उमेदवारी जाहीर होताच, राहुल कलाट्यांनी ठोकला शड्डू, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी होणार ? “
- हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी, थेट लढत होण्याची शक्यता
- हेही वाचा..कसब्यात आता हिंदू महासभाही मैदानात, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार