पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुका ह्या बिनविरोध व्हाव्या, असा सुर आता भाजपकडून केला जात आहे. तर दुसरीकडे ह्या निवडणुका बिनविरोध होणारच नाही. असा पलटवार महाविकास आघाडीकडून केला जात आहे. आज भाजपकडून दोन्ही पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेत. तर दुसरीकडे हिंदु महासभेकडून आनंद दवे हे देखील पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा..“पोटनिवडणुक बिनविरोध करा, आम्ही उमेदवारी टिळकांना देऊ..;” कसब्यातील पोटनिवडणुक चर्चेत
मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना डावलून भाजपने हेमंत रासने यांना आपली उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ब्राम्हण समाज कुठेतरी नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यातच आनंद दवे यांनी मुक्ता टिळक यांच्या परिवाराशी भेट घेतली. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांची ही दुसरी भेट असल्याचं सांगितलं. तसेच उद्या या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही भरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर वंचितची साथ असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हिंदु महासभाही मैदानात उतरली आहे. त्यामुळे ही निवडणुक थेट लढतीत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. यातच पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या, य़ासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु ही निवडणुक लढवणारच यावर महाविकास आघाडीतील नेते ठाम राहिले आहेत.
Read also
- हेही वाचा.. “तांबे-पटोले वादावर काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हात झटकले”, म्हणाले, त्यावर बोलणं..
- हेही वाचा.. “टिळक कुटुंबीयांना डावलून भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान केलाय “
- हेही वाचा.. “9 वर्षात 100 लाख कोटी भारतावर कर्ज वाढला, हाच मोदी सरकारचा अमृतकाळ आहे का ?” काॅंग्रेसचा सवाल
- हेही वाचा.. पोटनिवडणुंकामध्ये सोशल मीडिया ही ठरणार गेमचेंजर, उमेदवारांच्या हालचालींवर मतदारांचं लक्ष्य..!
- हेही वाचा.. क्या हिला दिया ना..! रजनीकांत स्टाईलने आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक टिप्पणी