मुंबई : हिंडनबर्ग रिपोर्टमुळे जगातील तसेच देशातील उद्योगपती गौतम अडाणी सध्या तोट्यात आले आहेत. मागील दहा दिवसात त्यांना 10 लाख कोटींचा घाटा झाला आहे. यातच गौतम अडाणी यांनी भारतील महत्वाच्या संस्था एलआयसी, एसबीआय सारख्या कंपन्यात देखील पैसे गुंतवले आहेत. यावरून देशातील विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यावरून आज राज्यात काॅंग्रेसकडून आंदोलने देखील करण्यात आली आहे. यावरून काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..निवडणुकीसाठी अश्विनी जगतापांचा प्रसार करण्यास सुरूवात, RSS चा जगतापांना पाठिंबा
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अडाणींनी देशातील जनतेच्या पैशाचा गैरवापर केला आहे. परंतु केंद्र सरकार त्यावर एकही शब्द बोलण्यास तयार नाही. देशातील ही लूट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केली आहे. त्यामुळे जनता त्यांना कधीही सोडणार नाही. असं म्हणत मोदींवर पटोले यांनी जोरदार टिका केली आहे. तसेच अलिकडेच केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सरकारी संपत्ती विकून मोदी सरकार 51, 000 कोटी उभे करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर अच्छे दिन चे स्वपन् दाखवणाऱ्या मोदी सरकारचे सरकारी मालमत्ता विकून कारभार करण्याएवढे बुरे दिन आले आहेत. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा….“शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”
भारतावर सध्या 2023 मध्ये 155 लाख कोटी कर्ज आहे. तेच कर्ज 2014 साली 55 लाख कोटी होतं. म्हणजे मोदी सरकारच्या काळात जवळपास 100 लाख कोटी कर्ज वाढलं आहे. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकण्याचे आश्वासन देणारे आज प्रत्येकाच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभारतायत. हाच मोदी सरकारचा अमृतकाळ आहे का ? असा सवालही नाना पटोले यांनी मोदी यांना विचारला आहे.
आजवर मोठ्या कष्टाने उभी केलेली सरकारी मालमत्ता विकून मोदी सरकार कारभार करतंय पण जेव्हा विकायला काही उरणार नाही तेव्हा मोदी सरकार काय करेल?
‘अच्छे दिन’च्या नावाखाली फसवणूक करत ‘बुरे दिन’च्या नरक यातना भोगायला लावणाऱ्या मोदी सरकारला जनता कदापि माफ करणार नाही. pic.twitter.com/D8kCetbtme
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 6, 2023
Read also
- हेही वाचा.. पोटनिवडणुंकामध्ये सोशल मीडिया ही ठरणार गेमचेंजर, उमेदवारांच्या हालचालींवर मतदारांचं लक्ष्य..!
- हेही वाचा.. क्या हिला दिया ना..! रजनीकांत स्टाईलने आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक टिप्पणी
- हेही वाचा..“पोटनिवडणुक बिनविरोध करा, आम्ही उमेदवारी टिळकांना देऊ..;” कसब्यातील पोटनिवडणुक चर्चेत
- हेही वाचा..“बापटांना घाम फोडणारा नेता आघाडीकडून कसब्याच्या पोटनिवडणुकीत उभा,” हेमंत रासनेंची डोकेदुखी वाढणार ?
- “हेही वाचा..रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा”, आव्हांडाचा भाजपला सवाल, आभारही मानले