पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड पोटनिवडणुक लागली आहे. या पोटनिवडणुीकीसाठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्हीही पोटनिवडणुकामध्ये लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा.. क्या हिला दिया ना..! रजनीकांत स्टाईलने आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक टिप्पणी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना काटे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांनी आज ट्विटमधून नाना काटे यांना महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे. असं म्हटलं आहे. या पोटनिवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज नाना काटे आज उमेदवारी अर्ज सादर करणार आहे.
हेही वाचा..“पोटनिवडणुक बिनविरोध करा, आम्ही उमेदवारी टिळकांना देऊ..;” कसब्यातील पोटनिवडणुक चर्चेत
ही निवडणुक आमची महाविकास आघाडी सर्वांनी मिळून लढवायची आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून आम्ही पुढे जातोय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत जशी मी चर्चा केली, तशीच शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरच उमेदवार असणार आहेत. तसेच सकाळी डांगे चौकात जमून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरला जाईल. अर्ज भरण्याच्यावेळी मी उपस्थित राहीन असं राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, दुसरीकडे चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांना मागील काही निवडणुकीत कडवी झुंज देणारे राहुल कलाटे अपक्ष म्हणून अर्ज सादर करणार आहेत. 2014 आणि 2019 च्या विधानसभेत लक्ष्मण जगताप यांना कडवी झुंज दिली होती. तसेच जगतापांच्या खालोखाल जनतेने मतं दिली होती. यातच त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता असतांना राष्ट्रवादीने नाना काटे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होण्याची आता दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
Read also
- हेही वाचा..कसब्यात आता हिंदू महासभाही मैदानात, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
- हेही वाचा.. “तांबे-पटोले वादावर काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हात झटकले”, म्हणाले, त्यावर बोलणं..
- हेही वाचा.. “टिळक कुटुंबीयांना डावलून भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान केलाय “
- हेही वाचा.. “9 वर्षात 100 लाख कोटी भारतावर कर्ज वाढला, हाच मोदी सरकारचा अमृतकाळ आहे का ?” काॅंग्रेसचा सवाल
- हेही वाचा.. पोटनिवडणुंकामध्ये सोशल मीडिया ही ठरणार गेमचेंजर, उमेदवारांच्या हालचालींवर मतदारांचं लक्ष्य..!