अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काॅंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नवनिर्विचित आमदार सत्यजीत तांबे यांनी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामध्ये तांबे आणि थोरात कुटुंबीयांना बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला होता. त्यानंतर पटोले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. यातच आता काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेता पदाचा राजीनामा दिल्याने काॅंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा.. “9 वर्षात 100 लाख कोटी भारतावर कर्ज वाढला, हाच मोदी सरकारचा अमृतकाळ आहे का ?” काॅंग्रेसचा सवाल
नाशिकच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी काॅंग्रेसने सत्यजीत तांबे यांना चुकीचे ऐबी फार्म दिले होते. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केल्याने त्यांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. त्याच दरम्यान बाळासाहेब थोरात रूग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन त्यांच्यासोबत झालेला सर्व प्रकार उघड करत नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
हेही वाचा.. पोटनिवडणुंकामध्ये सोशल मीडिया ही ठरणार गेमचेंजर, उमेदवारांच्या हालचालींवर मतदारांचं लक्ष्य..!
रूग्णालयातून बाहेर आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी काॅंग्रेसच्या वरिष्ठांकडे राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी नाना पटोले यांच्यासोबत काम न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील जे काही राजकारण झालं ते व्यथीत करणार आहे. असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे. यातच आज बाळासाहेब थोरातांनी विधीमंडळाचा पक्षनेता पदाचा राजीनामा दिल्याने काॅंग्रेसमधील नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात वाद चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा.. क्या हिला दिया ना..! रजनीकांत स्टाईलने आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक टिप्पणी
दरम्यान, येत्या 10 तारखेला काॅंग्रेसची कार्यकारीणी सभा होणार आहे. त्या सभेत यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा माझ्यापर्यंत अदयापही आलेला नाही. त्यामुळे यावर बोलणं आता उचित ठरणार नाही. तसेच यावर सगळे निर्णय काॅंग्रेसच्या कार्यकारीणी सभेत घेतला जाणार आहे. असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या 10 तारखेला नेमकं काय होणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा.. “नाना काटेंना उमेदवारी जाहीर होताच, राहुल कलाट्यांनी ठोकला शड्डू, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी होणार ? “
- हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी, थेट लढत होण्याची शक्यता
- हेही वाचा..कसब्यात आता हिंदू महासभाही मैदानात, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
- हेही वाचा.. “तांबे-पटोले वादावर काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हात झटकले”, म्हणाले, त्यावर बोलणं..
- हेही वाचा.. “टिळक कुटुंबीयांना डावलून भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान केलाय “