पुणे : चिंचवड पोटनिवणुकीसाठी भाजपकडून अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांना आपली उमेदवारी देण्यात आली आहे. यातच राहुल कलाटे देखील अपक्ष म्हणून उमेदवारी भरण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पार्टीकडून चिंचवड पोटनिवडणुकीकरीता मनोहर पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालय याठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले.
हेही वाचा.. “नाना काटेंना उमेदवारी जाहीर होताच, राहुल कलाट्यांनी ठोकला शड्डू, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी होणार ? “
अलिकडेच आम आदमी पार्टीच्या आकुर्डी येथील कार्यालयात ‘आप’चे प्रदेश उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड प्रभारी हरिभाऊ राठोड, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे व शहराध्यक्ष अनुप शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये चिंचवड विधानसभा पोट निवडणुक संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी यावर निर्णय घेण्यात आला आहे. या पोटनिवडणुकांसाठी महाराष्ट्राचे सहप्रभारी गोपाल इटालीया देखील पुण्यात आले होते.
हेही वाचा..कसब्यात आता हिंदू महासभाही मैदानात, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
चिंचवडमध्ये आता महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. त्यातच राहुल कलाटे यांना अगोदर महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु नाना काटे यांना उमेदवारी दिल्याने राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यातच आता आप देखील या पोटनिवडणुकीत उतरल्याने चिंचवडची पोटनिवडणुकीत रंगत आली आहे.
हेही वाचा.. “तांबे-पटोले वादावर काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हात झटकले”, म्हणाले, त्यावर बोलणं..
दरम्यान, चिंचवड मतदारसंघात 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. 2019 मध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी 38 हजार 498 मतांनी अपक्ष आमदार राहुल कलाटेंचा पराभव केला होता. यातच आता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर, आघाडीकडून नाना काटे यांना आपली उमेदवारी दिली आहेत. यासाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहेत. तर 02 मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे यानिवडणुकीत कोण बाजी मारणार त्याकडे आता सगळ्याचं लक्ष्य आहे.
Read also
- हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड..; राहुल कलाटे, नाना काटे, की अश्विनी जगताप ?
- हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांशी चर्चा व्हायला हवी होती,” सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा.. “अजित पवारांचे कट्टर समर्थक, ते माजी नगरसेवक, कोण आहेत आघाडीचे उमेदवार नाना काटे”?
- हेही वाचा.. “पोटनिवडणुकांमध्ये आघाडीत मोठी बंडखोरी, दांभेकर अन् राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार”
- हेही वाचा.. काॅंग्रेसला 440 व्होल्टचा झटका, पटोले-थोरात वाद चव्हाट्यावर, थोरातांचा विधीमंडळ पक्षपदाचा राजीनामा