पुणे : चिंचवड पोटनिवणुकीसाठी भाजपकडून अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांना आपली उमेदवारी देण्यात आली आहे. यातच राहुल कलाटे देखील अपक्ष म्हणून उमेदवारी भरण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पार्टीकडून चिंचवड पोटनिवडणुकीकरीता मनोहर पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड असून कोण विजयी गुलाल उधाळणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी, थेट लढत होण्याची शक्यता
दिवंगत आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सलग तीन वेळा लक्ष्मण जगताप चिंचवडमधून निवडून आले आहेत. 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणुक लढविली होती. त्यावेळी त्यांनी फक्त 7841 मतांनी शिवसेनेचे सध्याचे खासदार अप्पा श्रीरंग बारणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी 2014 आणि 2019 साली सलग दोन वेळा भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवून आमदार झाले होते. यातच त्यांनी अलिकडच्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी आजारी असतांनाही विधानभवनात येऊन मतदान केले होते. त्यामुळे सहाजिकच या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता जास्त आहे.
हेही वाचा..कसब्यात आता हिंदू महासभाही मैदानात, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
यातच 2014 ते 2019 मध्ये लक्ष्मण जगताप यांना राहुल कलाटे यांनी दोन्ही निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. 2014 च्या विधानसभेत राहुल कलाट्यांना शिवसेनेने तिकीट दिलं होतं. त्यावेळी त्यांना 63, 489 मत पडली होती. त्यानंतर मात्र राहुल कलाट्यांचा जनमत मोठ्या प्रमाणात तयार झाला. 2019 च्या विधानसभेत भाजप-शिवसेनेची युती झाल्याने राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडूक लढविली. त्यांना यावेळी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यात त्यांना 1,12,225 मतं तर लक्ष्मण जगताप यांना 1,50,723 मत पडली होती. यातच राहुल कलाटे आणि लक्ष्मण जगताप अशीच लढत चिंचवडमध्ये आतापर्यंत बघायला मिळत आली आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांच्या खालोखाल राहुल कलाटे यांचाच नंबर चिंचवडमध्ये लागतोय. यावेळी त्यांनीही अर्ज सादर केला आहे. त्यामुळे मतदारांचा कल त्यांच्याकडे अधिक असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा.. “तांबे-पटोले वादावर काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हात झटकले”, म्हणाले, त्यावर बोलणं..
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे. नाना काटे यांची सुरूवातीपासून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आहेत. तसेच त्यांची अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी राजकीय ओळख राहिली आहे. चिंचवड विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी नाना काटे यांनी पार पाडली आहे. 2014 साली चिंचवड विधानसभा निवडणुक लढविली. यातच आता नाना काटे यांना महाविकास आघाडीतील तिन्ही म्हणजे राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेनेची साथ मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुक नाना काटे ही इतर उमेदवारांपेक्षा उजवे ठरतांना दिसत आहेत.
हेही वाचा.. “टिळक कुटुंबीयांना डावलून भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान केलाय “
दरम्यान, चिंचवड मतदारसंघात 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. 2019 मध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी 38 हजार 498 मतांनी अपक्ष आमदार राहुल कलाटेंचा पराभव केला होता. यातच आता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर, आघाडीकडून नाना काटे यांना आपली उमेदवारी दिली आहेत. यासाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहेत. तर 02 मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे यानिवडणुकीत कोण बाजी मारणार त्याकडे आता सगळ्याचं लक्ष्य आहे.
Read also
- हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांशी चर्चा व्हायला हवी होती,” सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा.. “अजित पवारांचे कट्टर समर्थक, ते माजी नगरसेवक, कोण आहेत आघाडीचे उमेदवार नाना काटे”?
- हेही वाचा.. “पोटनिवडणुकांमध्ये आघाडीत मोठी बंडखोरी, दांभेकर अन् राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार”
- हेही वाचा.. काॅंग्रेसला 440 व्होल्टचा झटका, पटोले-थोरात वाद चव्हाट्यावर, थोरातांचा विधीमंडळ पक्षपदाचा राजीनामा
- हेही वाचा.. “नाना काटेंना उमेदवारी जाहीर होताच, राहुल कलाट्यांनी ठोकला शड्डू, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी होणार ? “