अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काॅंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नवनिर्विचित आमदार सत्यजीत तांबे यांनी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामध्ये तांबे आणि थोरात कुटुंबीयांना बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला होता. त्यानंतर पटोले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. यातच आता काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेता पदाचा राजीनामा दिल्याने काॅंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता सत्यजीत तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..कसब्यात आता हिंदू महासभाही मैदानात, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
जेव्हा एखादी व्यक्ती पक्षाच्या विचारधारेशी जोडलेली आहे. पक्षासाठी समर्पित भावनेते काम करत असताना त्यांना विश्वासात न घेणे किंवा एखाद्या निर्णयात सहभागी करून न घेणं, हे योग्य नाही. ते विधीमंडळ पक्षनेते आहेत. त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी होती, असे मला वाटते. काॅंग्रेसच्या अडचणीच्या काळात ज्यांनी नेतृत्व केलं. काॅंग्रेसच्या सर्व कार्यक्रमात झोकून देऊन काम केले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींनी गंभीर होऊन विचार केला पाहिजे. असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा.. “तांबे-पटोले वादावर काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हात झटकले”, म्हणाले, त्यावर बोलणं..
बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला हे मला माध्यमात आलेल्या बातम्यातून समजत आहे. मी प्रवासात असल्याने याबाबत माहिती घेता आली नाही. विधीमंडळ पक्षनेेते पदाचा राजीनामा हा हायकंमाडकडे देणे अपेक्षित आहे., त्यासाठी प्रदेश काॅंग्रेसशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही, मात्र त्याबाबत मला अधिक माहिती नाही. असं सुधीर तांबे यांनी म्हटलं आहे. यातच गेल्या काही दिवसांत बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कोणताही संपर्क झालेला नाही. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. मात्र, काॅंग्रेस हायकमांडकचे पक्षातील गटबाजीवर लक्ष आहे. माझ्याविरोधात चालू असलेल्या राजकारणावर मी लक्ष देत नाही. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा.. “टिळक कुटुंबीयांना डावलून भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान केलाय “
दरम्यान, रूग्णालयातून बाहेर आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी काॅंग्रेसच्या वरिष्ठांकडे राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी नाना पटोले यांच्यासोबत काम न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील जे काही राजकारण झालं ते व्यथीत करणार आहे. असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे. यातच आज बाळासाहेब थोरातांनी विधीमंडळाचा पक्षनेता पदाचा राजीनामा दिल्याने काॅंग्रेसमधील नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात वाद चव्हाट्यावर आला आहे.
Read also
- हेही वाचा.. “अजित पवारांचे कट्टर समर्थक, ते माजी नगरसेवक, कोण आहेत आघाडीचे उमेदवार नाना काटे”?
- हेही वाचा.. “पोटनिवडणुकांमध्ये आघाडीत मोठी बंडखोरी, दांभेकर अन् राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार”
- हेही वाचा.. काॅंग्रेसला 440 व्होल्टचा झटका, पटोले-थोरात वाद चव्हाट्यावर, थोरातांचा विधीमंडळ पक्षपदाचा राजीनामा
- हेही वाचा.. “नाना काटेंना उमेदवारी जाहीर होताच, राहुल कलाट्यांनी ठोकला शड्डू, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी होणार ? “
- हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी, थेट लढत होण्याची शक्यता