पुणे : सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीवरून नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याच दरम्यान बाळासाहेब थोरात रूग्णालयात उपचार घेत होते. रूग्णालयातून बाहेर येताच बाळासाहेब थोरातांनी नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत विधीमंडळातील पक्षनेता पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातच आता बाळासाहेब थोरात भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच करू अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
हेही वाचा.. “अजित पवारांचे कट्टर समर्थक, ते माजी नगरसेवक, कोण आहेत आघाडीचे उमेदवार नाना काटे”?
सत्यजीत तांबे यांच्याबाबत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण झालं आहे. याप्रकरणाबाबत पक्ष श्रेष्ठींकडे पत्र पाठवलं आहे. असं म्हणत बाळासाहेब थोरतांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करण्याची आता इच्छा नाही. असही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आता बाळासाहेब थोरात काय निर्णय घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
हेही वाचा.. “पोटनिवडणुकांमध्ये आघाडीत मोठी बंडखोरी, दांभेकर अन् राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार”
बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार का ? असा सवाल विचारले असता. बावनकुळे म्हणाले की, बाळासाहेब थोरातच नाही तर कोणालाही पक्षात यायचे असेल तर भाजपचे दरवाजे उघडे आहेत. ते जर आले तर त्यांचा योग्य सन्मान राखू, काॅंग्रेसमध्ये त्यांच्या असलेल्या उंचीपेक्षा मोेठे स्थान त्यांना देऊ, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा.. काॅंग्रेसला 440 व्होल्टचा झटका, पटोले-थोरात वाद चव्हाट्यावर, थोरातांचा विधीमंडळ पक्षपदाचा राजीनामा
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळातील पक्षनेता पदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज मी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्यांनी मला विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. पण हा माझ्या पक्षाअंतर्गत प्रश्न आहे. हा प्रश्न मी वरिष्ठांशी बोलून सोडवेल. असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा.. ““याचे परिणाम भोगावे लागतील”, संभाजी राजेंचा आव्हाडांना कडक इशारा
- हेही वाचा.. “राहुल कलाट्यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी, सुनील शेळके कलाट्यांच्या भेटीला
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत आपचा नेता ठरला..; उमेदवारी अर्ज सादर करणार
- हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड..; राहुल कलाटे, नाना काटे, की अश्विनी जगताप ?
- हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांशी चर्चा व्हायला हवी होती,” सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया