मुंबई : नाशिकच्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबेबाबत जे काही राजकारण झालं ते व्यथीत करणार आहे. असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत विधीमंडळ पक्षनेता पदाचा राजीनामा दिला. परंतु बाळासाहेब थोरातांनी अद्यापही मला काही सांगितलेलं नाही. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर अजित पवारांना बाळासाहेब थोरातांनी सर्व काही सांगितलं आहे. यातच आता काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत आपचा नेता ठरला..; उमेदवारी अर्ज सादर करणार
बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देणे हे दुर्दैवी आहे. मी त्यांचा मनधरणी करण्याचा प्रयत्न करेन. काॅंग्रेस पक्षासाठी शक्य ते सर्वकाही करेन असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. तर बाळासाहेब थोरातांचा विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा आहे की पत्र आहे, हे अजून माहिती नाही. त्यांचे कोणाशी बोलणे झालेले नाही. मी काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत पुण्यात होतो. पटोले यांनादेखील याबाबत माहिती नाही. तसेच हे सर्व वाद तात्पुरते असतात सगळं ठीक होईल, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. असं सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड..; राहुल कलाटे, नाना काटे, की अश्विनी जगताप ?
दरम्यान, रूग्णालयातून बाहेर आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी काॅंग्रेसच्या वरिष्ठांकडे राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी नाना पटोले यांच्यासोबत काम न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील जे काही राजकारण झालं ते व्यथीत करणार आहे. असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे. यातच आज बाळासाहेब थोरातांनी विधीमंडळाचा पक्षनेता पदाचा राजीनामा दिल्याने काॅंग्रेसमधील नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात वाद चव्हाट्यावर आला आहे.
Read also
- हेही वाचा..“भकास झालेल्या कसब्याला सजवायला येतोय,” अभिजीत बिचुकलेंनी दाखल केला कसब्यातून अर्ज
- हेही वाचा.. तब्बल 10 हजार रूपयांची चिल्लर घेऊन पोहचला, चिंचवडच्या अपक्ष उमेदवाराची कमाल, अधिकारी पैसे मोजून थकले
- हेही वाचा..“थोरातांचा राजीनामा अजित पवारांना माहिती, पण पटोलेंना नाही, आघाडीत नेमकं काय चाललंय?”
- हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये उंचीपेक्षा मोेठे स्थान देऊ, थोरातांना भाजपची ऑफर
- हेही वाचा.. ““याचे परिणाम भोगावे लागतील”, संभाजी राजेंचा आव्हाडांना कडक इशारा
- हेही वाचा.. “राहुल कलाट्यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी, सुनील शेळके कलाट्यांच्या भेटीला