पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधानानंतर या दोन्ही मतदार संघात पोटनिवडणुक लागली असून यासाठी 26 फेब्रवारी रोजी मतदान होणार आहे. तर 02 मार्चला याची मतमोजणी होणार आहे. यासाठी आज महाविकास आघाडी, भाजपसह अनेक अपक्ष आमदारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड..; राहुल कलाटे, नाना काटे, की अश्विनी जगताप ?
कसब्यातून भाजपकडून हेमंत रासने तर आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी आपने किरण कद्रे यांना उमेदवारी दिली आहे. सुरूवातीपासून ही निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. यातच अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी देखील कसब्यातून आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांशी चर्चा व्हायला हवी होती,” सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया
जोपर्यंत मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोपर्यंत निवडणुक लढणं हे मला भाग आहे. मी दोन वर्षापासून कसबा पेठेत राहतोय. मग येथील लोकांचे प्रश्न माझे नाहीत का ? मध्यंतरी कसबा भकास झाला असे काही बॅनर्स लागले होते. त्याच भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येत आहे. असं अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा.. तब्बल 10 हजार रूपयांची चिल्लर घेऊन पोहचला, चिंचवडच्या अपक्ष उमेदवाराची कमाल, अधिकारी पैसे मोजून थकले
- हेही वाचा..“थोरातांचा राजीनामा अजित पवारांना माहिती, पण पटोलेंना नाही, आघाडीत नेमकं काय चाललंय?”
- हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये उंचीपेक्षा मोेठे स्थान देऊ, थोरातांना भाजपची ऑफर
- हेही वाचा.. ““याचे परिणाम भोगावे लागतील”, संभाजी राजेंचा आव्हाडांना कडक इशारा
- हेही वाचा.. “राहुल कलाट्यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी, सुनील शेळके कलाट्यांच्या भेटीला
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत आपचा नेता ठरला..; उमेदवारी अर्ज सादर करणार