पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 40 उमेदवारांनी केलेल्या अर्जपैकी 33 उमेदवारांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. तर सात उमेदवारांचे एबी अर्ज अपुर्ण भरल्याने बाद ठरवण्यात आले आहे. यामध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार मनोहर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज अपुर्ण भरल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. तर अपक्ष उमेदवार चेतन ढोरे यांनी देखील आपल्या उमेदवारी अर्जात प्रतिज्ञापत्र अपुर्ण भरल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. यावर राहुल कलाटे यांनी निवडणुकीसाठी का उभे आहोत. यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा..आमदाराकीची शपथ घेतल्यानंतर तांबे लागले कामाला, केसरकरांची भेट, त्यानंतर थेट आझाद मैदानावर
मागील दोन वेळा विधानसभेच्या निवडणुकीकरीता उभा होतो. त्यावेळी जनतेने मला भरभरून मतं दिली होती. यातच पिंपरी चिंचवड महापालिकेत गटनेता म्हणून देखील काम करत असतांना सरकारच्या चुकीच्या कामांना विरोध केला आहे. यातच जनतेच्या भावना होत्या, म्हणून मी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. असं अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“एका बाजूला मोदींच्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला अडाणींच्या घोषणा,” सभागृहात मोठा गदारोळ”
यातच सुरूवातीपासून राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावर बोलतांना मागील निवडणुकीत मी अपक्ष म्हणूनच उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्यानंतर सात ते आठ दिवसानंतर मला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. यामध्ये अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी मदत केली होती. असं राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवावं”
मागच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात काॅंग्रेसच्या उमेदवाराला किती मतं पडली होती. त्याची तुलना माझ्याशी करा. मला किती मत पडली होती. असं म्हणत मला आघाडीकडून डावलण्यात आलं. चिंचवड मतदार संघ मी आघाडीकडे मागत होतो. परंतु काही क्षणात हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला. त्यानंतर मी अपक्ष म्हणून निवडणुक लढवण्याचं ठरवलं. यातच ही जर जागा शिवसेनेकडे आली तर ती जागा घेता येईल. त्यामुळे काल दोन अर्ज दाखल केले. एक अपक्ष म्हणून तर दुसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून अर्ज दाखल केला आहे. असंही ते म्हणाले. मागच्या निवडणुकीचा विचार केला तर या मतदार संघात राष्ट्रवादीला मत पडलेली नाहीत. त्यामुळे मी दुसरा अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून भरला आहे. कारण मला अपक्ष म्हणून शिवसेनेच्या पाठिंब्यावर मागच्या वेळी चांगली मत पडली होती. असंही ते म्हणाले.
Read also
- हेही वाचा..मोठी बातमी..! राजीव सातवर यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला
- हेही वाचा..“ठरलं तर.. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध, आता कसून प्रचार करा
- हेही वाचा..“पटोलेंच्या ‘त्या’ घिसाडघाईच्या निर्णयामुळे चांगले चाललेले सरकार गेले”, शिवसेनेची जहरी टिका
- हेही वाचा..“मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही, शिंदे-फडणवीस हे जनाधार नसणारं सरकार”
- हेही वाचा..‘कसब्यातील उमेदवारीवरून ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या बातम्यावर ‘ती’ पोस्ट व्हायरल