मुंबई : राज्यात झालेल्या विधानसभेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात फार पडला. यामध्ये अपक्ष आमदार सत्यजीत तांबे, सुधारकर आडबाले, ज्ञानेश्वर म्हात्रे, विक्रम काळे, आणि धीरज लिंगाडे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून पहिले दादा, अजित दादा दुसरे दादा सत्यजीत दादा अशा घोषणा तांबे समर्थकांनी दिल्या.
हेही वाचा..“वरळी नाही, ठाणे नाही तर एकनाथ शिंदेंनी माझ्याविरोधात…,”आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना नवा चॅंलेंज
विधान परिषदेच्या सदस्यात्वाची शपथ घेतल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी लगेच शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याबाबतच्या शासन निर्णय काढतांना ज्या शाळांमध्ये पुन्हा तपासणीची अट घातली आहे. ती अटक काढून सर्वांना अनुदान सुरू करावे. अशी विनंती केली आहे. यावेळी त्यांनी दिपक केसरकर यांना स्वांतत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी लिहिलेले अमृत मंथन व अमृत गाथा हे ग्रंथही भेट दिले.
हेही वाचा.. “ये तो सिर्फ झांकी है..! मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है,” वरळीतील सभेवरून मुख्यमंत्र्यांना इशारा
विधानभवनातून बाहेर आल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. जूनी पेन्शन आणि इतर मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. त्यावेळी त्यांच्याशी भेटून त्यांनी समस्या जाणून घेतल्या. तसेच दीपक केसरकर यांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याबाबत व शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केले, हे दोन अतिशय चांगले निर्णय घेतले त्याबद्दल आपले आभार.
हेही वाचा..“शरद पवारांची तुलना राजर्षी शाहु महाराजांशी”, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा गरम होणार?
परंतु विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय काढताना त्यामध्ये शाळांना पुन्हा तपासणीची अट घातलेली आहे मुळातच या अगोदर देखील अनेक वेळा या शाळा, वर्ग व तुकड्यांची तपासणी झालेली असून ही अट काढून सर्वांना अनुदान सुरू करावे. तसेच शिक्षण सेवकांचे मानधन आपण वाढविले परंतु येथून पुढे शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ ही महागाई निर्देशांकानुसार आपोआप व्हावी. तसेच शिक्षणाचे इतरही अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यामध्ये जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न हा अत्यंत गांभीर्याचा असून त्यासाठी आपण मला चर्चेसाठी वेळ द्यावी ही विनंती. असं म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..“एका बाजूला मोदींच्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला अडाणींच्या घोषणा,” सभागृहात मोठा गदारोळ”
- हेही वाचा..“आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवावं”
- हेही वाचा..राहुल कलाटे चिंचवडच्या पोटनिवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार, जाणून घ्या, किती संपत्ती ?
- हेही वाचा..‘“१६ आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता, त्यामुळे घाईने निर्णय घेऊ नका,” उद्धव ठाकरेंची आयोगाला मागणी
- हेही वाचा..“शिंदे आमच्यासोबत म्हणणाऱ्या शिरसाठांना ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर”, म्हणाले, “कोणी सुरुंग लावला तर..”