पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीकरीता शेवटच्या दिवशी तब्बल 40 उमेदवारांनी 53 अर्ज सादर केले आहेत. उमेदवारांची सादर केलेल्या अर्जांची छाननी 07 तारखेला होणार असून यात किती अर्ज बाद होतात. त्याकडे लक्ष्य आहे. राष्ट्रवादीवादीकडून नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. तर महाविकास आघाडीसोबत बंड करून राहुल कलाटे यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. यातच राहुल कलाटे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.
हेही वाचा..‘माफी मागतो, पण एवढे मोठे कारण नाही’; डीजेवरून राडा प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!
राहुल कलाटे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीकरीता सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल 61 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचं नमुद केलं आहे. त्यांच्यावर एक कोटी दहा लाख सात हजार 248 रूपयांचे कर्ज देखील आहे. कलाटे यांच्या कुटुंबीयांची एकुण मालमत्ता एक कोटी 40 लाख 20 हजार 593 आहे. कलाटे यांची स्थावर मालमत्ता 60 कोटी तीन लाख 76 हजार 319 रूपये आहे. तर जंगम आणि स्थावर मालमत्ता 61 कोटी 43 लाख 96 हजार 912 रूपयांची मालमत्ता आहे.
हेही वाचा.. ठाकरेंनी सांगितलंय, पाठिंबा आपल्यालाच, त्यामुळे कलाट्यांना सांगण्याचं काम आम्ही करू, बाकी मग.. अजित पवार
राहुल कलाटे यांनी आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत हा स्वत:च्या शेती उत्पन्न आणि व्यापार दाखवला आहे. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत. कलाटे यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील खेड, मुळशी, तालुक्यांत शेतजमिनी आहेत. तर रहाटणी, वाकडे येथे सदनिका असून त्यांच्याक 92 हजार 640 रूपये तर त्यांच्या पत्नीकडे 53 हजार 750 रूपये रोख रक्कम आहे. तर त्यांच्याकडे 15 तोळे सोने, तर त्यांच्या पत्नीकडे 15 तोळे सोने, दोन किलो चांदी असून त्यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा..“भकास झालेल्या कसब्याला सजवायला येतोय,” अभिजीत बिचुकलेंनी दाखल केला कसब्यातून अर्ज
दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी 40 उमेदवारांनी रिंगणात उतरून निवडणुक लढण्याचं ठरवलं आहे. भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून नाना काटे, बंडखोर उमेदवार राहुल कलाटे, आपकडून मनोहर पाटील, संभाजी ब्रिगेडकडून प्रवीण कदम, गोपाळ तंतरपाळे यांनी काॅंग्रसेमध्ये बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Read also
- हेही वाचा..‘“१६ आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता, त्यामुळे घाईने निर्णय घेऊ नका,” उद्धव ठाकरेंची आयोगाला मागणी
- हेही वाचा..“शिंदे आमच्यासोबत म्हणणाऱ्या शिरसाठांना ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर”, म्हणाले, “कोणी सुरुंग लावला तर..”
- हेही वाचा..“वरळी नाही, ठाणे नाही तर एकनाथ शिंदेंनी माझ्याविरोधात…,”आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना नवा चॅंलेंज
- हेही वाचा.. “ये तो सिर्फ झांकी है..! मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है,” वरळीतील सभेवरून मुख्यमंत्र्यांना इशारा
- हेही वाचा..“शरद पवारांची तुलना राजर्षी शाहु महाराजांशी”, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा गरम होणार?