सासवड : (saswad) गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय वातारवण हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. अनेकदा सत्ताधारी आणि विरोधक आपली स्वत: ची तुलना महापुरूषांची करतांना दिसत आहेत. यामधून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघतांना दिसत आहे. यात मग एकमेकांवर चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहे. यातच (Sharad pawar ) शरद पवार यांची तुलना राजर्षी शाहु महाराज यांच्याशी केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये उंचीपेक्षा मोेठे स्थान देऊ, थोरातांना भाजपची ऑफर
सासवड मध्ये सत्यशोधक समाज परिषद (Satyshodhak Samaj Parished) आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदमध्ये प्रा. हरी नरके (Hari Narke ) यांनी (Sharad pawar ) शरद पवार यांची तुलना राजर्षी शाहु महाराज यांच्याशी केली आहे. तर बाबा आढाव हे आजच्या काळातील महात्मा फुले आहेत, असंही ते म्हणाले. या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. तर सुप्रिया सुळे यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.
हेही वाचा.. ““याचे परिणाम भोगावे लागतील”, संभाजी राजेंचा आव्हाडांना कडक इशारा
हरी नरके नेमके काय म्हणाले.. ?
“एकदा सयाजीराव गायकवाड सगळ्यांना दरबारात बोलवतात अन् मान्यवरांना खुर्चीवर बसवातात. त्याच ठिकाणी महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसुड वाचताहेत. शरद पवार बाबा आढाव यांना बोलावयाचे आणि ते सांगायचे ते पारूप मला पुन्हा एकदा (Sharad pawar ) शरद पवार मुख्यमंत्री असतांना दिसलं. त्यामुळे बाबा आढाव हे आताचं महात्मा फुलेंचं रूप आहे. आणि शरद पवार हे आताचे राजर्षी शाहू महाराज आहेत. ”
हेही वाचा.. “राहुल कलाट्यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी, सुनील शेळके कलाट्यांच्या भेटीला
दरम्यान, अलिकडेच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ य़ांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केली होती. महाराष्ट्रात जितक्या चळवळी झाल्या जितकी आंदोलने झाली, त्याचे केंद्र पुणे राहिले आहे. आजच्या कार्यक्रमात नवीन सुरूवातही येथून झाली आहे. आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्यासारख्या ज्योतिंबाचा शोध जारी आहे. चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने रान पेटवलं होतं. त्यामुळे प्रा. हरी नरके यांच्या वक्तव्यानंतर भाजप काय भूमिका घेणार त्याकडेही आता लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा..‘माफी मागतो, पण एवढे मोठे कारण नाही’; डीजेवरून राडा प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!
- हेही वाचा.. ठाकरेंनी सांगितलंय, पाठिंबा आपल्यालाच, त्यामुळे कलाट्यांना सांगण्याचं काम आम्ही करू, बाकी मग.. अजित पवार
- हे सर्व वाद तात्पुरते असतात, नंतर सगळं ठीक होईल, पटोले थोरातांच्या वादावर सुशील कुमार शिंदेंचा विश्वास
- हेही वाचा..“भकास झालेल्या कसब्याला सजवायला येतोय,” अभिजीत बिचुकलेंनी दाखल केला कसब्यातून अर्ज
- हेही वाचा.. तब्बल 10 हजार रूपयांची चिल्लर घेऊन पोहचला, चिंचवडच्या अपक्ष उमेदवाराची कमाल, अधिकारी पैसे मोजून थकले
- हेही वाचा..“थोरातांचा राजीनामा अजित पवारांना माहिती, पण पटोलेंना नाही, आघाडीत नेमकं काय चाललंय?”