मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेल्या वरळीत जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी ( Aditya thackeay ) आदित्य ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली. तसेच मुंबईतील अर्थसंकल्पावर देखील भाष्य केलं. मात्र ( Ekanath Shine) एकनाथ शिंदे यांच्या सभेला लोकांचा अप्लप्रतिसाद असल्याने अनेक जणांनी सभेतून काढता पाय घेतल्याचे व्हिडीओ राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी ट्विट केले आहे. त्यावरून शिंदेंना खोचक टोलेही नेत्यांनी लगावले आहेत.
हेही वाचा..“थोरातांचा राजीनामा अजित पवारांना माहिती, पण पटोलेंना नाही, आघाडीत नेमकं काय चाललंय?”
मुंबई कोस्टल रोडकरीता उभारण्यात येणाऱ्या खांबांचे अतंर वाढवण्याची मागणी मान्य केल्याने मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील वरळी कोळीवाडा याठिकाणी शिंदेंची जाहीर सभा देखील पार पडली. मात्र या सभेला लोकांचा अल्पप्रतिसाद दिसून आला. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ( Amol mitkari ) यांनी शिंदेंचा एक व्हिडीओ ट्विट करत इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या लोकप्रिय सरकारच्या कार्यकाळात झपाट्याने होत असलेल्या विकासानंतर शिंदे-फडणवीस सरकारची वरळी मतदारसंघातील ऐतिहासिका सभा. असं म्हणत ये तो सिर्फ झांकी है मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत मिटकरींनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.
हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये उंचीपेक्षा मोेठे स्थान देऊ, थोरातांना भाजपची ऑफर
तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदेंवर टोलेबाजी केली. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतांना लोक घरी निघालेत. वरळी कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखलवा. कशाला उगाच स्वत:ची अब्रु काढून घेताय. 32 वर्षाचा तरूण नेता भारी पडतोय. असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आव्हानांवरून भाष्य केलं. तर व्हिडीओ ट्विट करत एवढे मोठे मैदान अर्धे रिकामे कसे झाले? असा खोचक सवाल आमदार सचिन अहिर यांनी केला.
हेही वाचा.. ““याचे परिणाम भोगावे लागतील”, संभाजी राजेंचा आव्हाडांना कडक इशारा
मुख्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना टोला
वरळीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. काही जण सकाळी उठतात खोके गद्दार बोलतात. काही लोकं मला आव्हान देत आहेत. असे सांगितले. पण मी छोटे मोठे आव्हान स्वीकारत नाही, मला जे आव्हान स्वीकारायचं ते सहा महिन्यापूर्वी केलं असं प्रत्युत्तर शिंदेंनी ठाकरेंना दिलं. आव्हानाची इच्छा असेल तर त्यांनी मग महापालिकेच्या वॉर्डात उभे राहावे असा टोलाही त्यांनी लगावला.
33 देशानं ज्यांच्या “गद्दारी”ची दखल घेतली त्यांच्या सभेत अयोध्याला खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत म्हणजे अयोध्या देशद्रोही आहे का?😭😭😭😭😭#खेळ_खल्लास_गद्दारांनो pic.twitter.com/nAGuG4S8R8
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) February 8, 2023
मुख्यमंत्र्यांच भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. @वरळी
कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..
कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..
32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना? pic.twitter.com/FoYvWFVTIn— Sanjay Raut (@rautsanjay61) February 7, 2023
Read also
- हेही वाचा..“शरद पवारांची तुलना राजर्षी शाहु महाराजांशी”, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा गरम होणार?
- हेही वाचा..‘माफी मागतो, पण एवढे मोठे कारण नाही’; डीजेवरून राडा प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!
- हेही वाचा.. ठाकरेंनी सांगितलंय, पाठिंबा आपल्यालाच, त्यामुळे कलाट्यांना सांगण्याचं काम आम्ही करू, बाकी मग.. अजित पवार
- हे सर्व वाद तात्पुरते असतात, नंतर सगळं ठीक होईल, पटोले थोरातांच्या वादावर सुशील कुमार शिंदेंचा विश्वास
- हेही वाचा..“भकास झालेल्या कसब्याला सजवायला येतोय,” अभिजीत बिचुकलेंनी दाखल केला कसब्यातून अर्ज
- हेही वाचा.. तब्बल 10 हजार रूपयांची चिल्लर घेऊन पोहचला, चिंचवडच्या अपक्ष उमेदवाराची कमाल, अधिकारी पैसे मोजून थकले