मुंबई : गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे युवा नेते आणि माझी मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. हिमंत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन माझ्याविरोधात वरळीतून लढावं, असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी दिलं. त्यावर काल मुख्यमंत्र्यांनी वरळीतील सभेतून आदित्य ठाकरे यांना डिवचलं. त्यावर आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा..“थोरातांचा राजीनामा अजित पवारांना माहिती, पण पटोलेंना नाही, आघाडीत नेमकं काय चाललंय?”
वरळीतून लढून दाखवण्याचं मी काल मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. वरळीतून नसेल तर ठाण्यातून तरी लढून दाखवा, असं मी त्यांना सांगितलं. मी त्यांना आणखी एक चॅलेंज देतो. त्यांची माझ्याविरोधात लढण्याची हिंमत किंवा ताकद नसेल तर येत्या अधिवेशनात राज्यपालांचं भाषण होण्याऐवजी महाराष्ट्र द्वेष्ट्या राज्यापालांना बदलून दाखवावं, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना दिलं आहे.
हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये उंचीपेक्षा मोेठे स्थान देऊ, थोरातांना भाजपची ऑफर
आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर एकनाथ शिंदे यांनी काल वरळीतील सभेतून पलटवार केला आहे. “काही जण सकाळी उठतात खोके गद्दार बोलतात. काही लोकं मला आव्हान देत आहेत. असे सांगितले. पण मी छोटे मोठे आव्हान स्वीकारत नाही, मला जे आव्हान स्वीकारायचं ते सहा महिन्यापूर्वी केलं असं प्रत्युत्तर शिंदेंनी ठाकरेंना दिलं. आव्हानाची इच्छा असेल तर त्यांनी मग महापालिकेच्या वॉर्डात उभे राहावे “, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा.. ““याचे परिणाम भोगावे लागतील”, संभाजी राजेंचा आव्हाडांना कडक इशारा
दरम्यान, शिंदेंच्या टिकेवर पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला. राज्यपालांना जायचं आहे. त्यांनी तसं पंतप्रधानांना कळवलं आहे. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर बोलत नाहीत. हे चित्र महाराष्ट्रासाठी घातक आहे. अशी टिका करत शिंदेंनी माझ्याविरोधात वॉर्डातून लढण्यास तयार असतील तर मी वॉर्डातून लढण्यास तयार आहे. असं म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा.. “ये तो सिर्फ झांकी है..! मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है,” वरळीतील सभेवरून मुख्यमंत्र्यांना इशारा
- हेही वाचा..“शरद पवारांची तुलना राजर्षी शाहु महाराजांशी”, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा गरम होणार?
- हेही वाचा..‘माफी मागतो, पण एवढे मोठे कारण नाही’; डीजेवरून राडा प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!
- हेही वाचा.. ठाकरेंनी सांगितलंय, पाठिंबा आपल्यालाच, त्यामुळे कलाट्यांना सांगण्याचं काम आम्ही करू, बाकी मग.. अजित पवार
- हे सर्व वाद तात्पुरते असतात, नंतर सगळं ठीक होईल, पटोले थोरातांच्या वादावर सुशील कुमार शिंदेंचा विश्वास
- हेही वाचा..“भकास झालेल्या कसब्याला सजवायला येतोय,” अभिजीत बिचुकलेंनी दाखल केला कसब्यातून अर्ज