मुंबई : शिंदेंच्या बंडाळीनंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये धनुष्यबाण आणि शिवसेनेवरून जोरदार राजकीय लढाई सुरू झाली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाही. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधत आहेत. तर शिंदे गटातील नेत्यांकडूनही संजय राऊतांवर पलटवार केला जात आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
हेही वाचा..“शरद पवारांची तुलना राजर्षी शाहु महाराजांशी”, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा गरम होणार?
यातच शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी संजय राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा जनतेमधून निवडणून येऊन दाखवावं, असं आव्हान दिलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, राजीनामा देण्याचीची जर चर्चा सुरू आहे तर महाज्ञानी आणि स्वाभिमानी राऊतांनी आमदारांच्या जीवावर मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. आणि जमलंच तर परत खासदार होऊन दाखवावे, असं आव्हान शीतल म्हात्रे यांनी राऊतांना दिलं आहे.
हेही वाचा..‘माफी मागतो, पण एवढे मोठे कारण नाही’; डीजेवरून राडा प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!
अलिकडेच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन माझ्याविरोधात वरळीतून निवडून दाखवावं. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
राजीनामा देण्याचीच जर चर्चा सुरु आहे तर महाज्ञानी आणि स्वाभिमानी राऊतांनी आमदारांच्या (राऊतांच्या भाषेत- रेडा, दगड, गिधाड इ.) जीवावर मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा!!! आणि जमलंच तर परत खासदार होऊन दाखवावे!!! आहे हिंमत??
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) February 7, 2023
Read also
- हेही वाचा..राहुल कलाटे चिंचवडच्या पोटनिवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार, जाणून घ्या, किती संपत्ती ?
- हेही वाचा..‘“१६ आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता, त्यामुळे घाईने निर्णय घेऊ नका,” उद्धव ठाकरेंची आयोगाला मागणी
- हेही वाचा..“शिंदे आमच्यासोबत म्हणणाऱ्या शिरसाठांना ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर”, म्हणाले, “कोणी सुरुंग लावला तर..”
- हेही वाचा..“वरळी नाही, ठाणे नाही तर एकनाथ शिंदेंनी माझ्याविरोधात…,”आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना नवा चॅंलेंज
- हेही वाचा.. “ये तो सिर्फ झांकी है..! मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है,” वरळीतील सभेवरून मुख्यमंत्र्यांना इशारा