हिंगोली : माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर काल अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. त्यामुळे हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ला केल्याची माहिती डॉ. प्रज्ञा सातव यांनी पोस्ट लिहून दिली आहे. कळमनुरी तालुक्यात त्या काॅंग्रेसच्या हात से हात जोडो अभियानाला गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
हेही वाचा..“एका बाजूला मोदींच्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला अडाणींच्या घोषणा,” सभागृहात मोठा गदारोळ”
डॉ. प्रज्ञा सातव ह्या काॅंग्रेस पक्षाच्या हात से हात जोडो अभियानात काल सहभागी झाल्या. त्या अभियानात नियोजित दौऱ्यानिमित्त कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात गेल्या असता त्यांच्यावर पाठीमागून येऊन अज्ञात व्यक्तींना हल्ला केला आहे. त्यामुळे याची चर्चा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावरून महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा..“आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवावं”
त्यावेळी त्यांच्यासोबत काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, भागवत चव्हाण, उमाकांत शेवाळकर, गणेश लोखंडे, ब्रह्मानंद काळे, बाळू पाटील व इतर उपस्थित होते. याठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. त्यांच्याशी हुजत घालत पाठीमागून येऊन धक्काबुक्की केल्याचीही चर्चा आहे. त्या गावात पोहोचल्यानंतर आधी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्नही या इसमाने केला होता.
हेही वाचा..राहुल कलाटे चिंचवडच्या पोटनिवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार, जाणून घ्या, किती संपत्ती ?
डॉ. प्रज्ञा सातव यांनी झालेल्या घटनेची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “मी कळमनुरी तालुक्यात काही गावांच्या दौऱ्यावर होती. या दरम्यान कसगे धावंडा या गावी गाडीतूून उतर होती. तेव्हा एक इसम माझ्या गाडीच्या दरवाज्याजवळ आला. त्यामुळे मी पटकन गाडीत बसली आणि दार लावून घेतला. त्यानंतर माझ्या बॉडिगार्डने त्याला बाजूला केलं. बॉडीगार्डने त्या इसमाला बाजूला केल्यानंतर मी उतरून नियोजित कार्यक्रमाला गेली. तिथे मी इतरांशी बोलू लागली. तेव्हा हा इसम मागून आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. मी पटकन सावरली आणि सगळ्यांनी त्याला पकडलं. लगेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.”
सुप्रिया सुळे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी
डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्लाही मोठी गंभीर बाब आहे. एका महिला लोकप्रतिनीधींवर अशा प्रकारे हल्ला होतो हे खेदजनक आहे. माझी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, तातडीची बाब म्हणून प्रज्ञा सातव यांना सुरक्षा द्यावी. या प्रकरणाची कसून चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे.
विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर कसबे धवंडा, ता. कळमनुरी येथे झालेला हल्ला ही मोठी गंभीर बाब आहे. एका महिला लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला होतो हे खेदजनक आहे. https://t.co/3RYXn2RxRH
— Supriya Sule (@supriya_sule) February 8, 2023
Read also
- हेही वाचा..“ठरलं तर.. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध, आता कसून प्रचार करा
- हेही वाचा..“पटोलेंच्या ‘त्या’ घिसाडघाईच्या निर्णयामुळे चांगले चाललेले सरकार गेले”, शिवसेनेची जहरी टिका
- हेही वाचा..“मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही, शिंदे-फडणवीस हे जनाधार नसणारं सरकार”
- हेही वाचा..‘कसब्यातील उमेदवारीवरून ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या बातम्यावर ‘ती’ पोस्ट व्हायरल
- हेही वाचा..आमदाराकीची शपथ घेतल्यानंतर तांबे लागले कामाला, केसरकरांची भेट, त्यानंतर थेट आझाद मैदानावर