पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काॅंग्रेसने उमेदवारी न दिल्याने बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांना बाळासाहेब दाभेकर यांच्याकडे पाठवलं होतं. त्यांनी याबाबत कुठलाही निर्णय कळवला नव्हता. परंतु यातच आता कसबा पेठ पोटनिवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा..“मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही, शिंदे-फडणवीस हे जनाधार नसणारं सरकार”
पक्षाने माझ्यावर खुफ अन्याय केला आहे. माझं वय 60 वर्ष, त्यातील 40 वर्ष मी पक्षासाठी काम केलं आहे. मग आता लढणार नाही तर कधी? असा सवाल करीत बाळासाहेब दाभेकर यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे काॅंग्रेसच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यानंतर नाना पटोले यांच्या आदेशानुसार आमदार संग्राम थोपटे, शहाराध्यक्ष अरविंद शिंदे, धनंजय वाडकर, अभय छाजेड, कमल व्यवहारे, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबुब नादाफ यांनी दाभेकर यांची मनधरणी केली होती. त्यानंतर आता दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
हेही वाचा..‘कसब्यातील उमेदवारीवरून ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या बातम्यावर ‘ती’ पोस्ट व्हायरल
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा वाद चव्हाट्यावर आला. त्यातच काॅंग्रेसमध्येच बाळासाहेब दाभेकर यांनी बंडाळी केली. त्यामुळे काॅंग्रेसमधील अंतर्गत वाद निर्माण झाला होता. त्यामुळे बाळासाहेब दाभेकर यांना काॅंग्रेसच्या नेत्यांनी समजावल्यानंतर त्यांनी आता अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा..आमदाराकीची शपथ घेतल्यानंतर तांबे लागले कामाला, केसरकरांची भेट, त्यानंतर थेट आझाद मैदानावर
दरम्यान, भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काॅंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. यातच सुरूवातीपासून तिकीट वाटपावरून काॅंग्रेस आणि इतर राजकीय पक्षांमध्ये खलबतं सुरू झाली होती. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांनी देखील महाविकास आघाडीकडून उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडाळी केली आहे.
Read also
- हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला, मुनगंटीवार, पाटील, मिसाळ भाजपची फौज मैदानात
- हेही वाचा..‘राहुल कलाट्यांना शिवसेनेकडून अजूनही अपेक्षा, सादर केले दोन अर्ज, ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष्य
- हेही वाचा..मोठी बातमी..! राजीव सातवर यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला
- हेही वाचा..“ठरलं तर.. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध, आता कसून प्रचार करा
- हेही वाचा..“पटोलेंच्या ‘त्या’ घिसाडघाईच्या निर्णयामुळे चांगले चाललेले सरकार गेले”, शिवसेनेची जहरी टिका