पुणे : कसबा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराची सुरूवात आज पुण्यातून करण्यात आली आहे. यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील इतर भाजपचे पदाधिकारी या प्रचारासाठी उपस्थित होते. यावेळी हेमंत रासने यांनी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात महाआरती करून प्रचाराचा नारळ फोडला आहे.
हेही वाचा..‘कसब्यातील उमेदवारीवरून ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या बातम्यावर ‘ती’ पोस्ट व्हायरल
या पोटनिवडणुकीसाठी येथील जनता मत देणार आहेत. त्यामुळे आमच्या विचाराचा विजय म्हणजे विकासाचं विजय, आमच्या विचाराचा विजय म्हणजे सत्याचा विजय, आमच्या विचाराचा विजय म्हणजे मोदींच्या विचाराचा विजय असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. तसेच मी तर ह्याठिकाणाही नाही. त्यामुळे मला विचारण्यापेक्षा येथील जनतेला विचारा. असं म्हणत त्यांनी जनता भाजपच्या पाठीमागे असल्याचं सुचक वक्तव्य केलं.
हेही वाचा..आमदाराकीची शपथ घेतल्यानंतर तांबे लागले कामाला, केसरकरांची भेट, त्यानंतर थेट आझाद मैदानावर
देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहाराचा विकास आम्ही करू पाहत आहोत. पुढील पन्नास वर्षात सर्वात सुंदर पुणे शहर करण्याचं स्वप्न फडणवीसांचं आहे आणि या स्वप्नांला पुर्ण करण्यासाठी पुणेकरांची साथ आहे. अन् ते आम्ही नक्की करू असं हेमंत रासने यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..‘राहुल कलाट्यांना शिवसेनेकडून अजूनही अपेक्षा, सादर केले दोन अर्ज, ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष्य
- हेही वाचा..मोठी बातमी..! राजीव सातवर यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला
- हेही वाचा..“ठरलं तर.. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध, आता कसून प्रचार करा
- हेही वाचा..“पटोलेंच्या ‘त्या’ घिसाडघाईच्या निर्णयामुळे चांगले चाललेले सरकार गेले”, शिवसेनेची जहरी टिका
- हेही वाचा..“मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही, शिंदे-फडणवीस हे जनाधार नसणारं सरकार”